एक्स्प्लोर

Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज

Rain Update: राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे, तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

पुणे: राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आगामी ४ ते ५ दिवसांत कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून या भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची मोठी तूट (Deficiency) नोंदवण्यात आली असून नंदुरबारमध्ये पावसाचे प्रमाण तब्बल -७६ टक्क्यांपर्यंत खालावले आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

Rain Update:  कुठे कसा असणार पाऊस? (पुढील ४ ते ५ दिवसांचा अंदाज)

कोकण आणि घाटमाथा: किनारपट्टीवरील जिल्हे आणि घाटमाथ्यावर पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित असून या भागात ऑरेंज अलर्ट राहील.

विदर्भ: पूर्व विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा व मध्य महाराष्ट्र: पर्जन्यछायेच्या प्रदेशांमध्ये हवामान ढगाळ राहील. सर्वदूर मुसळधार पाऊस न होता, केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.

Rain Update:  मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची भीषण तूट

१ जूनपासून आजपर्यंतच्या पावसाची जिल्हानिहाय आकडेवारी पाहता, मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हे, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे.

  जिल्ह्यानुसार पावसाची तूट

नंदुरबार: -७६%

हिंगोली: -५९%

लातूर: -४४%

अकोला: -४१%

परभणी: -४०%

याशिवाय धुळ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ही तूट ३० ते ४० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

Rain Update:  मान्सून असूनही पाऊस का गायब?

सध्या मान्सून सक्रिय आहे; परंतु अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र किंवा कोणतीही मोठी हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नाही. त्यामुळे ढग जमा होऊनही सार्वत्रिक असा मुसळधार पाऊस पडत नाहीये, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, 'एल निनो'चा प्रभाव जूनपासूनच सुरू झाला आहे. मात्र, चार-पाच दिवसांच्या पावसावरून एल निनोचे विश्लेषण करता येत नाही. मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यांत आणि संपूर्ण हंगामाच्या शेवटी एल निनोचा एकूण परिणाम अधिक स्पष्ट होईल, असेही डॉ. सानप यांनी सांगितले. येत्या काळात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसारच पुढील नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Update: पुढील पाच दिवस कुठे काय अलर्ट?

21 जुलै - मुंबई, पालघर, ठाणे,रायगड, पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

पालघर,नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ,वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

22 जुलै- पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी रायगड ठाणे, पालघर जिल्ह्यांसह नाशिक सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

23 जुलै - तळ कोकणासह संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून जळगाव,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.

24 जुलै - ठाणे रायगड रत्नागिरी पुणे व सातारा घाटमाथा व गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

25 जुलै - रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर गेलो अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रभरातील पावसाचा जोर कमी होणार आहे.

Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भाग आणि लगतच्या घाट परिसरात पुढील 2 ते 3 दिवस वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget