एक्स्प्लोर
फिटनेसच्या बाबतीत विराट कोहली 'या' फुटबॉलपटूचा फॅन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसकडे, डाएटकडे, व्यायामाकडे खूप लक्ष देतो. विराटचे फिटनेस फंडे अनेक तरुणांना, नवोदित खेळाडूंना प्रेरणा देतात. परंतु विराट कोहलीला चांगल्या फिटनेससाठी एक जगप्रसिद्ध फुटबॉलपटू प्रेरित करतो.
![फिटनेसच्या बाबतीत विराट कोहली 'या' फुटबॉलपटूचा फॅन virat kohli follows cristiano ronaldo for fitness फिटनेसच्या बाबतीत विराट कोहली 'या' फुटबॉलपटूचा फॅन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/02234214/Virat-Kohli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसकडे, डाएटकडे, व्यायामाकडे खूप लक्ष देतो. विराटचे फिटनेस फंडे अनेक तरुणांना, नवोदित खेळाडूंना प्रेरणा देतात. परंतु विराट कोहलीला चांगल्या फिटनेससाठी एक जगप्रसिद्ध फुटबॉलपटू प्रेरित करतो. त्याचं नाव आहे ख्रिस्तियानो रोनाल्डो.
कोहलीचं फुटबॉलप्रेम तसं कधीच लपून राहिलेलं नाही. पण भारतीय संघाच्या या कर्णधाराने आज मोठी कबुली दिली आहे, ती म्हणजे फिटनेसच्या मुद्यावर पोर्तुगालचा फुटबॉलवीर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा त्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे.
जगभरातील अनेक खेळाडूंना, फुटबॉलप्रेमींना अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लायनल मेस्सीचे फिटनेस फंडे भावतात. परंतु विराट कोहलीला मेस्सीच्या तुलनेत रोनाल्डोची फिटनेस संस्कृती अधिक भावते. विराट आणि रोनाल्डो या दोघांनीही आपापल्या खेळात फिटनेस एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.
रोनाल्डो आणि विराट स्वतः त्यांच्या संघामध्ये फिटेस्ट खेळाडू आहेतच परंतु दोघांनीही त्यांच्या संघ सहकाऱ्यांना फिटनेसचे वेड लावल्याचे अनेक किस्सेही आपण ऐकले आहे. कोणत्याही दौऱ्यावर असताना विराट कोहली स्वतः सर्वात आधी जिममध्ये दाखल होतो, तसेच तो त्याचे सर्व सहकारी दररोज जिममध्ये येतात का? यावरही लक्ष ठेवून असतो.
विराटच्या शब्दांमध्ये सांगायचं, तर त्याच्यासाठी फिटनेसच्या मुद्यावर रोनाल्डो हा सर्वोत्तम आदर्श आहे. फिटनेससाठीची त्याची मेहनत आणि त्याची बांधिलकी कमालीची आहे. विराट म्हणतो की, रोनाल्डोचा फिटनेससाठीचा आग्रह माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
getty image
![फिटनेसच्या बाबतीत विराट कोहली 'या' फुटबॉलपटूचा फॅन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/02234543/GettyImages-831230982.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)