एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीची अकरा वर्ष पूर्ण

विराटनं अकरा वर्षांच्या कालावधीत एक सर्वोत्तम फलंदाज ते सर्वोत्तम कर्णधार अशी मोठी झेप घेतली आहे. 2008 साली भारताला अंडर-19चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर विराट कोहली नावाचा एक नवा नायक भारतीय क्रिकेटला मिळाला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची अकरा वर्षे पूर्ण केली आहे. विराटनं 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या दम्बुला वन डेत खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला काल अकरा वर्ष पूर्ण झाली. या अकरा वर्षांत बजावलेल्या कामगिरीसाठी भारतीय कर्णधारानं खास ट्विट करून देवाचे आभार मानले आहेत. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत एवढी मोठी कामगिरी बजावू शकू, याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता, असं विराटनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारतीय कर्णधारानं या ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांनाही त्यांची स्वप्नं साकार व्हावीत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आपलं लक्ष्य गाठण्यासाठी नेहमी योग्य मार्गानं वाटचाल करण्याचा सल्लाही त्यानं दिला आहे.विराटनं अकरा वर्षांच्या कालावधीत एक सर्वोत्तम फलंदाज ते सर्वोत्तम कर्णधार अशी मोठी झेप घेतली आहे. 2008 साली भारताला अंडर-19चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर विराट कोहली नावाचा एक नवा नायक भारतीय क्रिकेटला मिळाला. त्यानंतर विराटला सेहवागच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं. आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. विराटनं आजवर 239 वन डे, 77 कसोटी आणि 70 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं 386 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 56.33 च्या सरासरीनं 20 हजार 502 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तब्बल 68 शतकं आणि 95 अर्धशतकांचा समावेश आहे. या अकरा वर्षात त्यानं विक्रमांचे अनेक इमलेही उभारले आहेत. 2016 साली महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विराटनं भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या काळात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघांना टीम इंडियानं पराभवाची धूळ चारली.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये केलेली कामगिरी:
46 कसोटी : 26 विजय, 10 पराभव 80 वन डे : 58 विजय, 19 पराभव 25 टी20 : 15 विजय, 9 पराभव

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget