एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परदेशी क्रिकेटपटू आवडत असतील, तर भारतातून चालता हो, कोहलीचा चाहत्याला सल्ला
कोहलीत काहीच खास नाही, आपल्याला परदेशी क्रिकेटपटू आवडतात, असं सांगणाऱ्या चाहत्याला कोहलीने थेट भारत सोडून जाण्याचा सल्ला दिला.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या कारकीर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे विराटचं नाव सतत चर्चेत आणि बातमीतही असतं. पण यावेळी विराटने नवा वाद ओढवून आपलं नाव चर्चेत आणलं आहे. कोहलीत काहीच खास नाही, त्यामुळे आपल्याला परदेशी क्रिकेटपटू आवडतात, असं सांगणाऱ्या चाहत्याला कोहलीने थेट भारत सोडून जाण्याचा सल्ला दिला.
सोशल मीडियावर विराट कोहली ट्रोलिंगचा सावज ठरला. नव्याने लाँच करण्यात आलेल्या 'विराट कोहली ऑफिशियल अॅप'चं प्रमोशन याला निमित्त ठरलं. या प्रमोशनल व्हिडिओत विराटने एका क्रिकेट रसिकाला भारत सोडून निघून जायला सांगितलेलं दिसतं. त्या चाहत्याचा गुन्हा काय तर त्याने केलेली पोस्ट.
भारतीय खेळाडू ओव्हररेटेड आहेत. एक फलंदाज म्हणून सध्या विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. सध्याच्या भारतीय फलंदाजांपेक्षा मला इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज अधिक भावतात, असं या चाहत्याने लिहिलं.
तुम्ही या देशात राहू नये, अशा शब्दात कोहलीने चाहत्याला उत्तर दिलं. इथे राहायचं आणि परदेशी खेळाडूंचं कौतुक करायचं हे योग्य नाही. तुम्ही भारतातून चालते व्हा आणि इतर देशात राहा, असा अनाहूत सल्ला कोहलीने दिला.
विराट कोहलीने स्वतःला हर्षल गिब्जसारखे परदेशी खेळाडू आवडतात, इथपासून विराटने लग्नही परदेशात केलं, याचा त्याला विसर पडला आहे का, अशा पद्धतीचं ट्रोलिंग सोशल मीडियावर होत आहे. मात्र कोहलीला खरोखर राग आला, की यामागे प्रमोशनचा फंडा आहे, हे लवकरच समजेल.
Virat Kohli "I don't think you should live in India, go and live somewhere else. Why are you living in our country and loving other countries" pic.twitter.com/YbPG97Auyn
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) November 6, 2018
And his favorite cricketer is Herschelle Gibbs ????????pic.twitter.com/g4bS6mXdDd
— Zoo Bear (@zoo_bear) November 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
क्रिकेट
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement