एक्स्प्लोर
आयसीसी वन डे संघाच्या कर्णधारपदी विराट !
नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजाला आयसीसीच्या वन डे संघात स्थान मिळालं आहे. इतकंच नाही, तर या टीमचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विराटला आयसीसीच्या कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही. भारताकडून एकट्या रवीचंद्रन अश्विनचाच आयसीसीच्या कसोटी संघात समावेश झाला आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड, दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीवीर गॅरी कर्स्टन आणि श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटर कुमार संगकारानं या संघांची निवड केली आहे.
निवड करण्यासाठी सप्टेंबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीतल्या कामगिरीचा आधार घेण्यात आला आहे. या दरम्यान विराटने आठ कसोटीत 45 च्या सरासरीने 451 धावा केल्या असून त्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. दुसरीकडे वन डेत विराटने 62च्या सरासरीने 138 धावा केल्या आहेत. तर ट्वेन्टी-20 मध्ये त्याने तब्बल 85.62 च्या सरासरीने 685 धावा केल्या.
आयसीसी वन डे संघ :
विराट कोहली (कर्णधार)
डेव्हिड वॉर्नर
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर)
रोहित शर्मा
एबी डिव्हीलियर्स
जॉस बटलर
मिशेल मार्श
रवींद्र जाडेजा
मिचेल स्टार्क
कगीसो रबाडा
सुनील नारायण
इम्रान ताहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement