Vinesh Phogat: 'अपात्र ठरल्यानंतर नरेंद्र मोदींचा आलेला फोन, त्या अटी ऐकून मी लगेच नकार दिला'; विनेश फोगाटचा खुलासा
Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympics 2024) 50 किलो वजनी गटात नियमापेक्षा 100 ग्रॅम वजन अधिक आढळल्यानं निलंबित करण्यात आलं. यामुळं विनेश फोगाटचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगंल. यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आता विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.
विनेश फोगाटने (Vinesh Phogat) एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला ऑलिम्पिकमधून जेव्हा अपात्र करण्यात आले. तेव्हा नरेंद्र मोदींना फोन (PM Narendra Modi) आला होता. त्यांचा मला थेट फोन आला नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की त्यांना (पंतप्रधान मोदी) बोलायचे आहे. त्यावेळी अधिकारी विनेशने अटी मान्य करायला तयार नसल्याचे सांगत बोलण्यास नकार दिल्याचे तिने सांगितले.
नेमकं काय घडलं?
नरेंद्र मोदींसोबत बोलताना त्यांनी काही अटी घातल्या होत्या की, बोलत असताना माझा एकही माणूस माझ्यासोबत नसणार. त्यांच्याकडे एक माणूस असेल जो फोनवर बोलणं करुन देईल आणि व्हिडीओ शूट करेल आणि सोशल मीडियावर टाकण्यात येईल. मी हा व्हिडीओ सोशल मीडियावर जाईल का असे विचारले तेव्हा त्यांनी हो म्हटले. त्यावेळी मी नकार दिला, कारण मला माझ्या भावनांची खिल्ली उडवायची नव्हती. त्यांना खेळाडूंविषयी सहानुभूती असती तर ते रेकॉर्डिंगशिवाय बोलले असते. कदाचित त्यांना माहित असेल की विनेश बोलली तर दोन वर्षांचा हिशोब नक्की मागेल. ते त्यांच्या इच्छेनुसार रेकॉर्डिंग कट करू शकले असते पण मी तसे करू शकत नाही, असं विनेशने सांगितले.
पीटी उषा फोटो काढण्यासाठी आल्या होत्या-
काही दिवसांपूर्वी विनेश फोगाटने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रमुख पीटी उषा यांच्यावर देखील गंभीर आरोप केला होता. विनेशला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी पीटी उषा भेटण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यानचा एक फोटोही पीटी उषा यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवरुन देखील विनेश फोगाटने आरोप केला. पीटी उषा या भेटण्यासाठी नाही, तर फक्त फोटो काढण्यासाठी आल्या होत्या, असं विधान विनेश फोगाटने केलं.
विनेश फोगाट विधानसभेच्या मैदानात-
विनेश फोगाटने कुस्तीला रामराम करत थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विनेश फोगाटसोबतच कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. विनेशच्या या निर्णयानंतर आता ती कुस्तीच्या मैदानातून थेट राजकारणाच्या मैदानात दंगल करणार असं म्हटलं जातंय. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच काँग्रेसने तिला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत उतरवलं आहे. तिला काँग्रेसने जुलाना या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
संबंधित बातमी:
माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता क्रिकेटपटू जडेजा; लग्नाचीही तयारी झाली, पण एक घटना अन् The End