एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्यापासून अंडर-19 विश्वचषकाचा थरार, पृथ्वी शॉकडे लक्ष
या स्पर्धेत पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघासह सोळा संघ सहभागी झाले आहेत.
वेलिंग्टन : उद्याचा विराट कोहली किंवा स्टीव्ह स्मिथ कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर उद्यापासून न्यूझीलंडमध्ये सुरु होत असलेल्या अंडर-19 विश्वचषकात मिळेल. या स्पर्धेत पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघासह सोळा संघ सहभागी झाले आहेत.
त्या सोळा संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गटवार साखळीतून प्रत्येकी दोन असे आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यांनी उद्या विश्वचषकाला सुरुवात होईल.
भारताच्या पृथ्वी शॉ आणि शुभम गिलसह पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी, अफगाणिस्तानचा बाहीर शाह आणि ऑस्ट्रेलियाचा जेसन सांघाची कामगिरी या विश्वचषकाचं आकर्षण ठरेल.
स्टीव्ह वॉचा लेक ऑस्टिन आणि मखाया एनटिनीचा मुलगा थॅण्डोच्या कामगिरीकडेही जाणकारांचं लक्ष राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement