एक्स्प्लोर
दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिज संघात वेगवान गोलंदाजाचा समावेश
![दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिज संघात वेगवान गोलंदाजाचा समावेश Uncapped Alzarri To Join West Indies Squad दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडिज संघात वेगवान गोलंदाजाचा समावेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28175924/josef-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
किंग्स्टन(वेस्ट इंडिज): भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरताणा वेस्ट इंडिज संघाने जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. विंडिजने गोलंदाजी भक्कम करण्यासाठी अलझारी जोसेफ या वेगनान गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. दुसरी कसोटी 30 जुलैपासून खेळली जाणार आहे.
जोसेफ या 19 वर्षीय खेळाडूने वेस्ट इंडिजच्या अंडर-19 संघात दमदार कामगिरी केली होती. अंडर-19 विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध खेळताना जोसेफने विंडिजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
जोसेफने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना 8 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. विंडिजला भारता विरुद्ध अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायचा असल्यास 25 वर्षीय मिगूएल क्युमिल आणि जोसेफ यांच्यापैकी एकाला संधी द्यावी लागणार आहे. दोघांचाही पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)