एक्स्प्लोर
Advertisement
IPL10 : ट्रेण्ट बोल्टची जबरदस्त फिल्डिंग
राजकोट: कर्णधार गौतम गंभीर आणि ख्रिस लिननं दिलेल्या 184 धावांच्या अभेद्य सलामीच्या जोरावर, कोलकाता नाईट रायडर्सनं राजकोटच्या आयपीएल सामन्यात गुजरात लायन्सचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात गुजरात लायन्सनं कोलकात्याला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ख्रिस लिन आणि गौतम गंभीरच्या तुफान फटकेबाजीनं ते आव्हान अगदीच मामुली ठरलं.
याच सामन्यात केकेआरच्या ट्रेण्ट बोल्टने जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. बोल्टने गोलंदाजीत विशेष कामगिरी केली नसली, तरी त्याने केलेली फिल्डिंग लाजवाब होती.
14 व्या षटकात पियूष चावलाच्या गोलंदाजीवर गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने मोठा फटका मारला. हा फटका अडवण्यासाठी बोल्टने हवेत झेप घेतली आणि चौकार वाचवला.
इतकंच नाही तर बोल्टने हवेत उडी घेऊन सीमारेषेच्या आत जाऊन हवेत बॉल उडवून तो मैदानात ढकलला. त्यामुळे गुजरातला मिळणाऱ्या चार रन वाचल्या.
https://twitter.com/IPL/status/850374773716783104
VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा
गंभीर -लिनची जबरदस्त खेळी
कर्णधार गौतम गंभीर आणि ख्रिस लिननं दिलेल्या 184 धावांच्या अभेद्य सलामीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं राजकोटच्या आयपीएल सामन्यात गुजरात लायन्सचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला.
गंभीर -लिन जोडीने कोलकात्याला 31 चेंडू राखून विजयी लक्ष्य पार करून दिलं. ख्रिस लिननं 41 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 93 धावांची खेळी उभारली. गंभीरनं 48 चेंडूंमधली नाबाद 76 धावांची खेळी 12 चौकारांनी सजवली.
त्याआधी, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिकनं चौथ्या विकेटसाठी केलेल्या 87 धावांच्या भागिदारीनं गुजरात लायन्सला 20 षटकांत चार बाद 183 धावांची मजल मारून दिली होती. पण गुजरातच्या गोलंदाजांना त्या धावसंख्येचं संरक्षण करता आलं नाही.
संबंधित बातम्या
गंभीर-लीनची ऐतिहासीक भागीदारी, कोलकात्याचा दणदणीत विजय
GLvsKKR : गुजरातचा 10 विकेट्सने धुव्वा, कोलकात्याचा शानदार विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement