एक्स्प्लोर
टायगर श्रॉफ मुंबई मॅरेथॉनचा चेहरा, अॅम्बेसिडर म्हणून निवड
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची मुंबई मॅरेथॉनचा अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कारण मुंबई मॅरेथॉनचा अॅम्बेसिडर म्हणून टायगरची निवड करण्यात आली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी टायगरसोबत तसा करारदेखील केला आहे.
आजच्या जमान्यात यूथ आणि फिटनेस आयकॉन म्हणून बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफचं नाव अग्रक्रमाने घेण्यात येतं. त्यामुळं तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी मॅरेथॉनचा चेहरा म्हणून टायगरची निवड केली आहे.
यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचं 19 जानेवारीला आयोजन करण्यात आलं आहे. आशियातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये दरवर्षी 50 हजारांहून अधिक स्पर्धक भाग घेतात. स्पर्धेचं हे १७ वे वर्ष असणार आहे.
मॅरेथॉनच्या आयोजकांनी टायगरच्या या निवडीबद्दल सांगितले की, गेल्या 17 वर्षांपासून मुंबई मॅरेथॉन या शहरासह देशातील लोकांना केवळ धावण्यासाठीच नव्हे तर फिटनेस आणि चांगलं आरोग्य राखण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. टायगर श्रॉफ मॅरेथॉनचा चेहरा बनल्यामुळे अधिकाधिक लोक, तरुण मॅरेथॉनशी जोडले जातील, अशी आशा आहे.
The @TataMumMarathon has always held a special place in my heart and it is a proud moment for me to announce my association with a movement, that has not just created a running revolution but inspires millions to #BeBetter. Running soon. Stay tuned #TigerTracks pic.twitter.com/T0TUgZCj1U
— Tiger Shroff (@iTIGERSHROFF) November 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement