एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीत आज संध्याकाळी रंगणार बॉक्सिंगचा थरार
नवी दिल्ली: भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंह आज डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडिलवेट चषकात ऑस्ट्रेलियाई बॉक्सिंगपटू केरी होपविरोधात रिंगमध्ये उतरणार आहे.
दिल्लीतील पावसाळी वातावरणाचा संदर्भ घेऊन त्याने, दिल्लीत पाऊस सुरु आहे, पण आज संध्याकाळी मुष्टींचा पाऊस पाडण्यासाठी मी आतुर आहे, असे टविट त्याने केले आहे.
विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सर बनल्यानंतर आपली सर्व सहा प्रो बाउट जिंकला आहे. तो आज सर्वात जास्त अनुभवी प्रतिस्पर्धीशी भिडणार आहे. होप डब्ल्यूबीसी युरोपीय चॅम्पियन होता. त्याचा विजयाचा रेकॉर्ड २३-७ असा राहिला आहे.
विजेंदरने अधिकृत वजन केल्यानंतर म्हटले आहे की, मी या स्पर्धेची आणखी प्रतिक्षा करूव शकत नाही. मी सहा वर्षांनतर दिल्लीतील रिंगमध्ये उतरत आहे. गेल्या वर्षी कॉमनवेल्थ गेममध्ये देखील उतरलो होतो. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी मी अतिशय उत्साही आहे.
आतापर्यंत ३० वर्षीय या प्रतिस्पर्धीची बरोबरी करणे कोणलाही शक्य झाले नाही. त्यामुळे होप त्या मानाने तगडा प्रतिस्पर्धी असल्याचे बोलले जात आहे. होपचे वजन ७४.९ किलोग्रॅम आहे. या सामन्यासाठी मी खुप परिश्रम केले असून, त्यामुळे मी हा सामना निश्चितच जिंकेन असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement