एक्स्प्लोर
जाडेजाला सिंहासोबतचा सेल्फी पडला महागात; 20,000 दंड
अहमदाबाद: भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला सिंहांसोबत सेल्फीप्रकरणी गुजरातच्या वनविभागानं वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाडेजा सध्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजमध्ये असल्यानं त्याचे सासरे हरदेवसिंग सोळंकी यांनी त्याच्या वतीनं दंड भरल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.
जाडेजासोबतच अभयारण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जून महिन्यात जाडेजानं त्याची पत्नी रिवासह जुनागडच्या गीर अभयारण्याला भेट दिली होती.
अभयारण्यात दोघांनी गाडीतून खाली उतरून सिंहांसोबत फोटो काढले होते. पण वनविभागाच्या नियमांनुसार अभयारण्यात पर्यटकांना गाडीतून खाली उतरण्यास मनाई आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement