एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूरच्या कन्येला ऑलिम्पिकचं तिकीट, नेमबाज तेजस्विनी सावंत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतने जगाच्या नकाशावर महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. तेजस्विनी सावंत पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
दोहा : कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतने जगाच्या नकाशावर महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. तेजस्विनी सावंत पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
तेजस्विनीने दोहा इथं सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात चौथं स्थान पटकावलं आहे. या कामगिरीसह तिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटंही कन्फर्म केलं आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली तेजस्विनी ही भारताची 12वी नेमबाज ठरली आहे. तेजस्विनी 1171 गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. त्यानंतर अंतिम फेरीत तिनं 435 गुणांची कमाई करत चौथं स्थान पटकावलं.
39 वर्षांच्य़ा तेजस्विनी सावंतने याआधी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं आहे. 2010 सालच्या म्युनिकमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीने सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याआधी 2006 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 10 मीटर्स एअर रायफलमध्ये दुहेरीत आणि वैयक्तिक सुवर्ण जिंकलं होतं. तर 2018 साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement