Team India : भारतीय क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे की टीम इंडिया एक सोबत दोन सीरिज खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे याच काळात शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचा दुसरा चमू श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स हरल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचं लक्ष आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहे तर दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका कोरोनाच्या विळख्यात! टीम इंडियाचा आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
भारतीय क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच झालं आहे की टीम इंडिया एक सोबत दोन सीरिज खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम या दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे याच काळात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. यामुळंच श्रीलंका दौऱ्यात त्याच खेळाडूंना जागा मिळाली आहे जे भारतीय कसोटी संघात सहभागी नाहीत. इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर पाचवी कसोटी 10 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
असा असेल श्रीलंका दौरा
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे तर संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा असणार आहे. संघामध्ये आयपीएलमध्ये चमकलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, नितीश राणा, देवदत्त पडिकल आणि कृष्णप्पा गौतम यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश केला गेला आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका तर तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार पहिला वन डे सामना 18 जुलैला होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला वन डे सामना 18 जुलै, दुसरा आणि तिसरा वन डे सामना अनुक्रमे 20 आणि 23 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
टी 20 सामना 24 जुलैपासून
वन डे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार होते. टी 20 सामन्यांचे आयोजन 25 जुलैपासून करण्यात येणार आहे. दुसरा टी 20 सामना 27 जुलैला आणि तिसरा टी 20 सामना 29 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने आज संध्याकाळी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे.
श्रीलंका दौऱ्यात या खेळाडूंना संधी
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियामध्ये फलंदाजाच्या यादीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि के गौतम यांचा समावेश केला आहे. तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.