IND Vs ENG : इंग्लंड दौर्यावर टीम इंडिया कोरोना विषाणूच्या कचाट्यात आल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह सक्रिय झाले आहेत. जय शाह यांनी खेळाडूंना अधिक काळजी घ्यावी असे ईमेल लिहिले आहे. यासह, जय शाह यांनी खेळाडूंना कोरोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयकडून अशी माहिती मिळाली आहे की कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला ऋषभ पंत संघासोबत डरहमला जाणार नाही.
बीसीसीआयच्या एका सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे, की ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. त्याला गेल्या आठ दिवसांपासून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या ऋषभला कोणतीही लक्षणे दिसत नाही. सूत्रांनी सांगितले की, ऋषभ पंत त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आयसोलेशनमध्ये आहे. गुरुवारी तो टीमसह डोरहॅमला जाणार नाहीत."
ऋषभ पंत पुन्हा टीम इंडियामध्ये कधी सहभागी होईल की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ऋषभ पंतची कोरोना चाचणी 18 जुलै रोजी होऊ शकते. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर खेळाडूंना ब्रेक देण्यात आला होता.
जय शाह यांनी ईमेल लिहिले
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही जय शाह यांच्या ईमेलबद्दलची माहिती खेळाडूंना दिली आहे. शुक्ला म्हणाले, "आतापर्यंत इतर कोणताही खेळाडू पॉझिटिव्ह आढळला नाही. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सर्व खेळाडूंना पत्र लिहून नियम पाळण्यास सांगितले आहे.
शहा यांनी आपल्या पत्राद्वारे खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्यास सांगितले होते. शहा संघातील खेळाडूंना म्हणाले, "कोविडशील्ड लस केवळ संसर्ग रोखू शकते, यामुळे विषाणूचा धोका पूर्णपणे दूर होत नाही."
नुकत्याच झालेल्या विम्बल्डन टेनिस चँपियनशिप आणि युरो चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंनी जाऊ नये, असे शाह यांनी आपल्या पत्रात लिहिले होते. असे असूनही टीम इंडियाचे काही खेळाडू विम्बल्डन आणि युरो चषकांचे सामने पाहण्यासाठी गेले होते.