India vs Sri Lanka : पुढील आठवड्यापासून टीम इंडिया आणि श्रीलंकेदरम्यानच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने भारत-श्रीलंका मालिका 4 दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला होता. पहिली वन डे 13 जुलै ऐवजी 17 जुलैला घेण्यात येणार होती. परंतु आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार होते. परंतु दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामने पुढे ढकलण्यात आले. सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मालिका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले आहे.
दरम्यान या मालिकेसाठी कोच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात आणि शिखर धवनच्या नेतृत्वाच टीम इंडियानं जोरदार तयारी केली आहे. संघाचा जोरदार सराव सुरु असून दिग्गजांच्या अनुपस्थित युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं मोठं आव्हान असणार आहे.
18 जुलैला पहिला वनडे सामना
पहिली वनडे 17 जुलैला घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु आता नव्या वेळापत्रकानुसार पहिला वन डे सामना 18 जुलैला होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला वन डे सामना 18 जुलै, दुसरा आणि तिसरा वन डे सामना अनुक्रमे 20 आणि 23 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
टी 20 सामना 24 जुलैपासून
वन डे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार होते. टी 20 सामन्यांचे आयोजन 25 जुलैपासून करण्यात येणार आहे. दुसरा टी 20 सामना 27 जुलैला आणि तिसरा टी 20 सामना 29 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने आज संध्याकाळी नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया :
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, ईशन किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि सिमरनजीत सिंह.