एक्स्प्लोर
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?
या संघामध्ये सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माचाही समावेश आहे. शिवाय अजिंक्य रहाणेलाही संधी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दुखापतीतून सावरलेल्या केदार जाधवचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय वन डे संघात केदार जाधव आणि शार्दूल ठाकुरचं पुनरागमन झालं आहे. तर उमेश यादव आणि सलामीवीर केएल राहुलला संधी देण्यात आलेली नाही.
फेब्रुवारी 2018 मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. या संघामध्ये सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माचाही समावेश आहे. शिवाय अजिंक्य रहाणेलाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सलामीवीर फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणेला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार का, हा सर्वांसाठी मोठा प्रश्न आहे.
रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवायचं नाही, हे संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. अजिंक्य रहाणे सलामीवीर फलंदाज आहे. मात्र रोहित, धवनच्या उपस्थितीत त्याला बाहेर बसावं लागतं. ही सलामीवीर जोडी अगोदरच फॉर्मात असल्यामुळे रोटेशन पॉलिसीचा वापर केला तरच रहाणेला संधी मिळणं शक्य आहे.
अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज असल्याचं यापूर्वी विराट म्हणाला होता. शिखर धवनच्या अनुपस्थितीत रहाणेने संधीचा फायदा घेत चार सामन्यात अर्धशतकं ठोकले होते. ती मालिका भारताने 4-1 ने जिंकली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत धवनचं पुनरागमन झाल्याने रहाणेला पुन्हा बाहेर बसावं लागलं.
एकसारखे चार खेळाडू संघात असतात तेव्हा अशाच पद्धतीने संतुलन साधावं लागतं आणि एकाला अंतिम अकरामधून बाहेर रहावंच लागतं, असं विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी स्पष्ट केलं होतं. शिवाय रहाणे मधल्या फळीतील फलंदाज नसल्याचं सांगायलाही तो विसरला नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर
संबंधित बातम्या :
होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?
रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज : विराट कोहली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement