एक्स्प्लोर
अनुष्कासोबतचा 'तो' क्षण माझ्यासाठी अतिशय खास : विराट कोहली
लंडन : "मैंने कभी सोचा नहीं था ये दिन आएगा... वो आया अँण्ड आय एबल टू शेअर विथ हर..." टीम इंडियाचा कर्णधार हॅण्डसम हंक विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा यांच्या लव्ह अफेअरविषयी आपण गेल्या काही वर्षांपासून ऐकतोय. पण दोघांनीही अजूनही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. आयसीसीच्या एका मुलाखतीत विराट अनुष्काविषयी दिलखुलास बोलला आहे. विराटच्या या वाक्यातूनच दोघांमधलं बॉण्डिंग दिसून येतं.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा आजपर्यंत हवेतच होत्या. अवॉर्ड शो असो.. क्रिकेट मॅच असो...एअरपोर्टवर असो.. किंवा 'व्हॅलेंटाइन्स डे' निमित्त एकमेकांना विश करणं असो.....त्यांच्यातील चर्चा पुन्हा रंगू लागतात.
मात्र आजपर्यंत 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असणाऱ्या विरानुष्काने चुप्पी तोडली आहे. अनेक अडथळ्यांमधून विराट आणि अनुष्काचं नातं कसं घट्ट होत गेलं, हे स्टार स्पोर्टसच्या एका मुलाखतीत विराटने सांगितलं.
'मेलबर्नमध्ये कसोटी मालिकेदरम्यान मला संघाचा कर्णधार बनवल्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा अनुष्का माझ्यासोबतच होती. तो क्षण माझ्यासाठी अतिशय खास होता' असं सांगत विराटने अनुष्काचं खूप कौतुक केलं.
'स्टार स्पोर्टस'ने युट्यूबवर शेअर केलेल्या 52 सेकंदच्या या व्हिडीओमध्ये विराटने अनुष्कासोबतच्या खास क्षणांना उजाळा दिला.
प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात अनुष्का सोबत होती आणि आहे. हे माझ्यासाठी नेहमीच ग्रेट फील देणारं आहे, असंही तो म्हणाला.
आजवर क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या रंगल्या आणि फिसकटल्या. मात्र विराट आणि अनुष्काने आपली मैत्री, प्रेम, वैयक्तिक आयुष्य वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं, ज्यामुळे त्यांचं नातं आजपर्यंच अधिक घट्ट झालं.
दोघांच्याही चाहत्यांना विराटच्या 52 सेकंदाच्या व्हिडीओमुळे त्यांच्या नात्याची कल्पना आली असेलच. आता वाट पाहूयात ही जोडी लग्नबंधनात कधी अडकतेय याची.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement