एक्स्प्लोर

बेन स्टोक्सनं इतिहास रचला, आयसीसीच्या नव्या रँकिंगमध्ये ऑलराऊंडर नंबर वन!

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं इतिहास रचला आहे. आयसीसीच्या नव्या रँकिंगमध्ये स्टोक्स ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

मँचेस्टर: वेस्टइंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटीत शानदार खेळी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं इतिहास रचला आहे. आयसीसीच्या नव्या रँकिंगमध्ये  स्टोक्स ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आपल्या टेस्ट करिअरमध्ये त्याने पहिल्यांदाचं हे यश मिळवलं आहे. वेस्टइंडीजविरुद्ध सध्या सुरु कसोटी मालिकेत स्टोक्सने सर्वात जास्त धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अॅंड्रयू फ्लिंटॉफनंतर दुसरा इंग्लंडचा खेळाडू वेस्टइंडीज सोबत सुरु असलेल्या मँचेस्टर कसोटीत बेन स्टोक्सने पहिल्या डावात 176 रन्स आणि एक विकेट, तर दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा आणि दोन विकेट्स घेतल्या. या शानदार खेळीनंतर स्टोक्स आयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रँकिंगमध्ये 497 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. स्टोक्स हा अँड्रयू फ्लिंटॉफनंतर इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे ज्याने  टेस्ट ऑलराऊडर रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. जेसन होल्डरचं नुकसान कसोटी क्रिकेटमध्ये खूप दिवसांपासून वेस्टइंडिजचा कॅप्टन जेसन होल्डर नंबर वन ऑलराऊंडर होता. मात्र इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत खराब प्रदर्शनाचा फटका त्याला बसला आहे. तो आता 459 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याला या मालिकेत साजेशी खेळी करता न आल्याचा फटका बसला आहे. टॉप 5 मध्ये दोन भारतीय आयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर 397 गुणांसह रवींद्र जडेजा आहे तर 281 गुणांसह आर अश्विन पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 298 अंकांसह या यादीत चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडचा शानदार विजय  कोरोनामुळं सगळीकडे खेळांवर परिणाम झाला आहे. या संकटात देखील इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. प्रेक्षकांविना सुरु असलेल्या या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने चार विकेट्सनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात स्टोक्सच्या शानदार खेळीच्या बळावर इंग्लंडने सामना 113 धावांनी जिंकला आहे. या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसरा सामना 24 जुलैपासून मँचेस्टरमध्येच खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी कोरोना बाबत सर्व प्रकारच्या नियमांचे पालन केले जात आहे. संबंधित बातम्या IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा England vs West Indies | चार महिन्यांनी क्रिकेटपटू मैदानात मात्र चिअर करण्यासाठी प्रेक्षक नाहीत!

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget