एक्स्प्लोर

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषकाचा खरा थरार आजपासून, आज दोन लढती, तगड्या संघांमध्ये झुंज

T20 World Cup 2021 : आजपासून खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात होत आहे. आज ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुपर 12 मधील सामन्यांना सुरुवात होत आहे.

T20 World Cup 2021 :   आयसीसी टी-20 विश्वचषक  17 ऑक्टोबरपासून  यूएई आणि ओमानमध्ये सुरु झाला. 17 ऑक्टोबरपासून कालपर्यंत स्पर्धेच्या पात्रता फेरीचे (Qualifier Round) सामने खेळले गेले. यातून चार संघ सुपर 12 साठी निवडले गेले. आजपासून खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात होत आहे. आज ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुपर 12 मधील सामन्यांना सुरुवात होत आहे. 14 नोव्हेंबर रोजी दुबईत (Dubai) खेळल्या जाणाऱ्या अंतिम (Final) सामन्यात स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.

उद्या 24 ऑक्टोबरला  भारत (Team India) पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)  सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांना या विश्वचषकातील गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल.

कोविड -19 मुळे स्पर्धा स्थलांतरित

शेवटचा टी -20 विश्वचषक 2016 मध्ये भारतात खेळला गेला. यंदाही ही स्पर्धा भारतातच होणार होती. पण, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ती यूएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आली. बीसीसीआय (BCCI) या स्पर्धेचे यजमान आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला (वेस्ट इंडीज) आपल्या जेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान असेल. जर ते यात यशस्वी झाले, तर असे करणारा तो जगातील पहिला संघ असेल. दोन वेळा हे जेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिज हा जगातील एकमेव संघ आहे. या वर्षी या स्पर्धेचे स्वरूप आणि नियम जाणून घेऊया.

या मैदानावर सामने खेळले जातील

यंदाचे टी -20 विश्वचषक सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळले जातील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला जाईल.

23 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरु

टी -20 विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वालिफायर फेरीनंतर त्यात ग्रुप बी चा विजेता संघ स्कॉटलॅंड आणि ग्रुप ए चा उपविजेता संघ नामिबिया यांचा समावेश झाला आहे तर गट 1 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. क्वालिफायर फेरीनंतर, गट अ चा विजेता संघ श्रीलंका आणि गट ब चा उपविजेता संघ बांग्लादेशचा समावेश झाला आहे.  

उपांत्य फेरी 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी खेळली जाईल, अंतिम सामना 14 नोव्हेंबरला

यानंतर या स्पर्धेचा बाद फेरीचा टप्पा सुरू होईल. स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबरला तर दुसरी उपांत्य फेरी 11 नोव्हेंबरला खेळली जाईल. तर टी -20 विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीसाठी 15 नोव्हेंबर हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

ही पॉइंट सिस्टीम असेल

टी -20 विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात विजेत्या संघाला दोन गुण दिले जातील. दुसरीकडे, बरोबरी किंवा निकाल न लागल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गट 1 आणि गट 2 मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

तुम्ही भारतात टी-20 विश्वचषक सामने कुठे पाहू शकता?

आपण स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 2 वर टी 20 विश्वचषक सामने थेट पाहू शकता. याशिवाय, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स एचडी चॅनेलवरही सामना थेट प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना डिस्ने हॉटस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर तुमच्या मोबाईलवर थेट पाहू शकता. क्रिकेट चाहत्यांनाही टी 20 वर्ल्डकपचा ​​आनंद थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. हे सामने नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह 35 हून अधिक शहरांमधील 75 हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखवले जातील.

आयसीसी टी -20 विश्वचषकाचे टीम इंडिया स्क्वॉड 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक

24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि स्कॉटलॅंड  
नोव्हेंबर 8: नामिबिया वि भारत  

उपांत्य फेरी आणि अंतिम वेळापत्रक

10 नोव्हेंबर: पहिली उपांत्य फेरी
11 नोव्हेंबर: दुसरी उपांत्य फेरी
14 नोव्हेंबर: फायनल
15 नोव्हेंबर: अंतिम फेरीसाठी राखीव दिवस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget