एक्स्प्लोर
राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा : सुशील कुमार आणि साक्षीची 'सुवर्ण' कमाई
आपलं हे पदक देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करत असल्याचं सुशील कुमार म्हणाला.
जोहान्सबर्ग : भारताचा डबल ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारने जोहान्सबर्गच्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून आपलं पुनरागमन साजरं केलं. आपलं हे पदक देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करत असल्याचं तो म्हणाला.
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या साक्षी मलिकनेही या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 74 किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं.
सुशील कुमारने न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला अस्मान दाखवलं. साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या 62 किलो गटात न्यूझीलंडच्या टायला ट्यूहाईन फोर्डचा 13-2 असा धुव्वा उडवला.
या विजयानंतर बोलताना त्याने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ''तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे पदक मी आई-वडील, गुरु सतपाल जी पहेलवान आणि अध्यात्मिक गुरु योगऋशी स्वामी रामदेव आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो'', असं ट्वीट सुशीलने केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement