Suryakumar Yadav Injury : मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी वाढली; सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये खेळणार की नाही?
Suryakumar Yadav Injury : सूर्यकुमार यादवला दुखापतीनंतर नीट चालताही येत नव्हते, त्यामुळे आता तो फिट कधी होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे आयपीएल सीझन 2024 मध्ये खेळू शकेल का? अशी चर्चा रंगली आहे.
Suryakumar Yadav Injury : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. मात्र, यानंतर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या कर्णधाराला मैदान सोडावे लागले. सूर्यकुमार यादव पुन्हा मैदानात परतला नाही. मात्र, सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे टीम इंडियाशिवाय मुंबई इंडियन्सच्या अडचणीत भर पडली आहे. सूर्यकुमार यादवला दुखापतीनंतर नीट चालताही येत नव्हते, त्यामुळे आता तो फिट कधी होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आयपीएल सीझन 2024 मध्ये खेळू शकेल का? अशी चर्चा रंगली आहे.
Suryakumar Yadav was carried out of Ground 😢
— RoMan (@SkyXRohit1) December 14, 2023
Hope He's fine, injury is not serious 🤞#INDvsSA #INDvSA #SuryaKumarYadav pic.twitter.com/iLirUhHTSV
सूर्यकुमार यादव आयपीएल 2024 च्या हंगामात खेळू शकेल का?
जवळपास 6 महिन्यांनी टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. याआधी आयपीएल 2024 चा हंगाम आयोजित केला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तसेच, सूर्यकुमार यादव आयपीएल 2024 च्या हंगामातून बाहेर असू शकतो. पण सूर्यकुमार यादव आयपीएलच्या सुरुवातीला खेळू शकणार नसल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये बोलले जात आहे. मात्र, तो आयपीएलच्या मध्यावर मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसू शकतो.
Unfortunate TWIST for Team India!
— SkyExch (@officialskyexch) December 14, 2023
Suryakumar Yadav seems to have twisted his ankle and he is out of the field, Jadeja is the stand-in skipper on the field now!#SKY #SuryaKumarYadav #SkyExch #Injury #INDvsSA #Cricket pic.twitter.com/PLN5ftKRlm
जोहान्सबर्ग T20 मध्ये शतक ठोकले, पण नंतर...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 56 चेंडूत 100 धावा केल्या. टीम इंडियाच्या कर्णधाराने आपल्या इनिंगमध्ये 7 चौकार आणि 8 षटकार मारले. सूर्यकुमार यादवचे आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधील हे चौथे शतक आहे. त्याचवेळी टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावत 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 13.5 षटकांत 95 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने हा सामना 106 धावांनी जिंकला.
Most Player of the match awards in Men's T20I:
— Johns. (@CricCrazyJohns) December 14, 2023
Virat Kohli - 15 (115 matches)
Suryakumar Yadav - 14* (60 matches)
Sikandar Raza - 14 (78 matches)
Mohammad Nabi - 14 (109 matches)
Rohit Sharma - 12 (148 matches) pic.twitter.com/ukq2EFoSUz
इतर महत्वाच्या बातम्या