एक्स्प्लोर
Advertisement
...तर 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना तुरुंगवास
नवी दिल्ली : 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना वारंवार कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन भारतीय क्रिकेटचा कारभार अन्य कुणा सक्षम अधिकाऱ्याच्या हातात द्यायचा की नाही, याचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश दोन किंवा तीन जानेवारीला येऊ शकतो.
सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला प्रशासकीय पॅनेलसाठी नावं सुचवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला आहे. अॅमिकस क्युरीनी त्यासाठी गृहविभागाचे माजी सचिव जी. के. पिल्ले, माजी कसोटीवीर मोहिंदर अमरनाथ आणि कॅगचे प्रतिनिधी विनोद राय यांची नावं सुचवली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
क्रिकेट
Advertisement