एक्स्प्लोर

बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्मिथ, वॉर्नर, बॅनक्रॉफ्ट दोषी

स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट ऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे.

सिडनी : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी पूर्ण झाली असून यामध्ये संपूर्ण संघ नाही, तर तीनच खेळाडू यामध्ये दोषी आढळले आहेत. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी मागितली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. तर डॅरेन लिमन यांना या षडयंत्राची कल्पना नसल्याचं आढळल्यामुळे ते प्रशिक्षकपदी कायम राहणार आहेत. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट ऐवजी मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स यांची जोहान्सबर्गमधील चौथ्या कसोटीसाठी संघात वर्णी लागली आहे. टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावण्यात आलं आहे. पुढील 24 तासांमध्ये तिघा दोषी खेळाडूंना शिक्षा सुनावली जाणार आहे. खिलाडूवृत्तीचा देश ही ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळल्याच्या भावना सदरलँड यांनी व्यक्त केल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफी त्यांनी पत्रकार परिषदेत मागितली. काय आहे प्रकरण? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (तिसऱ्या) केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथनं याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं. बॅनक्रॉफ्टचं चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलंच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरुन पायउतार झाला, तर डेव्हिड वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला. आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत. बॉल टॅम्परिंग म्हणजे काय? बॉल टॅम्परिंग या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो. माती, बाटलीच्या झाकणाने किंवा कोणत्याही वस्तूनं चेंडू जाणीवपूर्वक घासणं, चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवणं, चेंडूवर दातांनी किंवा नखांनी ओरखडे पाडणं, मिंट किंवा च्युईंग गम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेनं किंवा व्हॅसेलिनसारखे पदार्थ लावून चेंडूच्या एका बाजूची लकाकी राखणं या साऱ्या बाबी बॉल टॅम्परिंगमध्ये मोडतात. संबंधित बातम्या :

व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद

तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल

स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!

'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं

क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना

स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पंत-जुरेलने श्रीलंकेची कोंडी केली! 112 धावांची भागीदारी, लंचपर्यंत भारताचा स्कोअर 419 पार, जाणून घ्या LIVE अपडेट
पंत-जुरेलने श्रीलंकेची कोंडी केली! 112 धावांची भागीदारी, लंचपर्यंत भारताचा स्कोअर 419 पार, जाणून घ्या LIVE अपडेट
Ind Vs Sl 2nd Test Rishabh Pant : काल ज्याने हात सुजवला, आज त्यालाच ऋषभ पंतने धू धू धुतला; स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, श्रीलंकेचे खेळाडू बघत बसले, VIDEO
काल ज्याने हात सुजवला, आज त्यालाच ऋषभ पंतने धू धू धुतला; स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, श्रीलंकेचे खेळाडू बघत बसले, VIDEO
IND vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : जैस्वालने श्रीलंकन गोलंदाजाला हेल्मेटने टक्कर दिली; अजय जडेजाचा पारा चढला, यशस्वीला नको नको ते बोलला
जैस्वालने श्रीलंकन गोलंदाजाला हेल्मेटने टक्कर दिली; अजय जडेजाचा पारा चढला, यशस्वीला नको नको ते बोलला

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'
Viral Video: एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
Embed widget