एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक पार्कमध्ये कॅमेरा कोसळून सात जण जखमी
![रिओ ऑलिम्पिक पार्कमध्ये कॅमेरा कोसळून सात जण जखमी Spectators Injured After Aerial Camera Falls In Rio Olympic Park रिओ ऑलिम्पिक पार्कमध्ये कॅमेरा कोसळून सात जण जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16075139/Rio-Camera-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रिओ दी जनैरो : ऑलिम्पिकच्या प्रक्षेपणासाठी वापरला जाणारा भलामोठा स्कायकॅम खाली कोसळल्यानं सात जण जखमी झाले आहेत. रिओच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली.
पार्कमधील बास्केटबॉल कोर्टजवळ या एरियल कॅमेराने चित्रीकरण सुरु होतं. त्यावेळी अचानक कॅमेराची केबल तुटली आणि अंदाजे 10 मीटर उंचीवरुन हा कॅमेरा खाली पडला.
या अपघातात दोन महिला, दोन लहान मुलांना दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक वाहिनीवर हा कॅमेरा पडत असतानाचं लाईव्ह टेलिकास्टही झालं. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)