एक्स्प्लोर

पदार्पणाच्या 7 वर्षांनी चमकला, अनेक कर्णधारांवर केले होते आरोप!

या मालिकेतून जयदेव प्रकाश झोतात आला असला, तरी त्याने 7 वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं. मात्र करिअरच्या चढउतारामुळे जयदेव लक्ष वेधू शकला नव्हता.

 मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत भारताचा युवा गोलंदाज जयदेव उनाडकट मालिकावीराचा मानकरी ठरला. जयदेवने यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांच्यापेक्षा कमी विकेट घेतल्या. मात्र त्याची सरासरी चांगली होती. जयदेवने 3 सामन्यांत 9 षटकं गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 44 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 4.88 होता. या मालिकेतून जयदेव प्रकाश झोतात आला असला, तरी त्याने 7 वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं. मात्र करिअरच्या चढउतारामुळे जयदेव लक्ष वेधू शकला नव्हता.  7 वर्षांपूर्वी पदार्पण जयदेवने डिसेंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. यानंतर तब्बल तीन वर्षांनी उनाडकटची पुन्हा भारतीय संघात निवड झाली. 2013 मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर होता, त्या संघात उनाडकटला संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्याने 7 वन डे सामन्यात 8 विकेट घेतला होता. मग पुन्हा उनाडकटला डावलण्यात आलं. पुन्हा तीन वर्षांनी जून 2016 मध्ये तो परत झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 संघात निवडला गेला. पदार्पणाच्या 7 वर्षांनी चमकला, अनेक कर्णधारांवर केले होते आरोप! पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात त्याने 4 षटकात 43 धावा दिल्या. या दौऱ्यातील एकमेव टी ट्वेण्टी सामना टीम इंडियाने गमावला. त्याचा फटका जयदेवला बसला, त्याला संघातून वगळण्यात आलं. टीम इंडियात कमी काळासाठी निवड आणि जास्त वेळ बाहेर, असंच काहीसं उनाडकटबाबत घडत होतं. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत राहिला. आयपीएलमध्ये तर त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचाच फायदा उनाडकटला झाला. पुन्हा एकदा जयदेवची भारताच्या संघात निवड करण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने जबरदस्त गोलंदाजी करुन, मालिकावीराचा मान मिळवला. धोनबद्दल म्हणतो... उनाडकटने एका मुलाखतीत आपली खदखद व्यक्त केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुनही, संघाबाहेर राहावं लागतं. कोणत्याही कर्णधाराने हवा तसा पाठिंबा दिला नाही, असं उनाडकट म्हणाला होता. मात्र त्याने धोनीचं कौतुक केलं होतं. पदार्पणाच्या 7 वर्षांनी चमकला, अनेक कर्णधारांवर केले होते आरोप! उनाडकट आयपीएलमध्ये धोनीच्या पुणे संघाकडून खेळला. पहिल्याच सामन्यात उत्तम कामगिरी केल्यामुळे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने पाठिंबा दिला. स्मिथ आणि धोनी भाईने मला मार्गदर्शन केलं. दबावात कामगिरी कशी करावी हे धोनीने सांगितलं, असं उनाडकट म्हणाला. आयपीएल 2017 मध्ये जयदेवने हॅटट्रिकसह 12 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget