एक्स्प्लोर
VIDEO : ...पाकिस्तानी बॉलरने आपल्याच खेळाडूला बॉल फेकून मारला!
क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांना भिडताना आपण बऱ्याचदा पाहतो. पण पाकिस्तानी सुपर लीगमधील एका सामन्यात असं काही घडलं की, ज्याने सारेच अवाक् झाले.

लाहोर : क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांना भिडताना आपण बऱ्याचदा पाहतो. पण पाकिस्तानी सुपर लीगमधील एका सामन्यात असं काही घडलं की, ज्याने सारेच अवाक् झाले.
पाकिस्तानी सुपर लीगमध्ये काल लाहोर कलंदर आणि क्वेटा ग्लेडियेटर यांच्यात सामना सुरु होता. यावेळी सामन्यातील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सोहेल खान आला. तो त्याला हवी तशी फिल्ड सेट करत होता. पण त्याच वेळी डीप स्केअर लेगवर उभ्या असलेल्या यासीर याला सोहेलचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे प्रचंड चिडलेल्या सोहेलने थेट यासीरलाच चेंडू फेकून मारला. सुदैवाने यासीरला चेंडू लागला नाही.
या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. मैदानातील परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी लाहोर कलंदरचा कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलम याने मध्यस्थी करुन दोन्ही खेळाडूंमधील वाद वेळीच सोडवला. दरम्यान, या सामन्यात लाहोरनं क्वेटा ग्लेडियेटर 17 धावांनी विजयही मिळवला. पण या विजयानंतरही दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोललेही नाही.Sohail Khan 😀 pic.twitter.com/Rdwy8CMqOQ
— Aamir Afzaal Malik (@Aamirviews) March 14, 2018
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
विश्व
महाराष्ट्र
पालघर
Advertisement
Advertisement




















