एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : श्रीलंकेच्या 'या' युवा खेळाडूचा विश्वविक्रम, विश्वचषकात शतक ठोकणारा तिसरा युवा फलंदाज

या सामन्यात अविष्का फर्नांडोने 103 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 104 धावा केल्या. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला. या आधी श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमानेने 25 वर्षाचा असताना 2015 च्या विश्वचषकात शतक ठोकले होते.

चेस्टर ले स्ट्रीट : श्रीलंका आणि वेस्ट इंडीजदरम्यान सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडो या 21 वर्षीय खेळाडूने दमदार शतक झळकावत अनोखा विक्रम केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा तो सर्वात तरुण श्रीलंकन फलंदाज तर ठरला. सोबतच विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात देखील तो तिसऱ्या क्रमांकाचा युवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या शतकाच्या बळावर श्रीलंकेनं 50 षटकांत सहा बाद 338 धावांची मजल मारली. अविष्का फर्नांडोनं झळकावलेलं शतक श्रीलंकेच्या डावात मोलाचं ठरलं. त्यानं 103 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली. विशेष म्हणजे फर्नांडोचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे पहिलंच ठरलं. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेनं 32, कुशल परेरानं 64 , कुशल मेंडिसनं 39, अँजलो मॅथ्यूजनं 26 आणि लाहिरु थिरीमनेनं नाबाद 45 धावांची खेळी उभारली. करुणारत्ने आणि परेरानं श्रीलंकेला 93 धावांची सलामी दिली. या सामन्यात अविष्का फर्नांडोने 103 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 104 धावा केल्या. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला. या आधी श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमानेने 25 वर्षाचा असताना 2015 च्या विश्वचषकात शतक ठोकले होते. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जगात देखील तो तिसऱ्या क्रमांकाचा तरुण फलंदाज ठरला. या आधी पॉल स्टर्लिंगने 20 वर्षे आणि 196 दिवस वय असताना 2011 मध्ये नेदरलँड्स विरुद्ध शतक केले होते. तर रिकी पॉन्टिंगने 21 वर्ष आणि 76 दिवस वय असताना 1996 साली शतक झळकावले होते. त्यानंतर फर्नांडोने आज 21 वर्ष आणि 87 दिवस वय असताना शानदार शतक ठोकत संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget