धक्कादायक! मोहम्मद शमीच्या विरोधात अफवा पसरवण्याची मोहीम पाकिस्तानमधून : रिपोर्ट
टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) सोशल मीडियावर काही लोकांनी ट्रोल केले होते.
नवी दिल्ली: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) सोशल मीडियावर काही लोकांनी ट्रोल केले होते. यानंतर अनेक दिग्गजांनी शमीला पाठिंबा दिला होता, सोबतच बीसीसीआयनं देखील शमीला पाठिंबा दिला होता. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या पराभवानंतर शमीविरुद्ध चुकीची माहिती देणारी मोहीम सुरू करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट व्हायरल केल्या गेल्या होत्या.
Mohammed Shami Abuse Update : सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या शमीची आजी-माजी क्रिकेटपटूंकडून पाठराखण
या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शमीविरोधातील ही खोटी माहिती पसरवणारी मोहिम पाकिस्तानमधून सुरु झाली असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहेल. एक अनव्हेरिफाईड ट्विटर हँडलनुसार, ज्यांचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत अशा लोकांनी हा प्रोपगेंडा काउंटर केला असल्याचं समोर आलं आहे.
BCCI on Mohammad Shami: शमीला ट्रोल करणाऱ्यांना बीसीसीआयचे चोख प्रत्युत्तर
सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचे अभिनंदन केल्याबद्दलही शमीला ट्रोल करण्यात आले, परंतु शमीवर केवळ द्वेषपूर्ण टिप्पण्या ठळकपणे हायलाइट केल्या गेल्या. इंस्टाग्रामवर शमीच्या विरोधात किंवा बाजूने टिप्पण्या पोस्ट करणारे बहुतेक लोक पाकिस्तानचे होते. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडूंना भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. शमीच्या तुलनेत भारतीय कर्णधारावर अधिक टीका झाली आणि ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही दिसून आली. सामन्याच्या काही दिवस आधी, कोहलीने एक व्हिडिओ शेअर केल्याने तो ट्रोल झाला होता.
बीसीसीआयसह दिग्गजांकडून शमीला पाठिंबा
दरम्यान या प्रकारानंतर बीसीसीआयने शमीला पाठिंबा दिला आहे. BCCIनं शमीचा एक फोटो शेअर करत 'गर्व, मजबूती. मागचं सगळं विसरा आणि पुढे जा.' असं कॅप्शन दिलंय. दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ट्विट करत म्हटलं की, 'जेव्हा आम्ही टीम इंडियाला सपोर्ट करतो, तेव्हा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सपोर्ट करतो. मोहम्मद शमी एक वचनबद्ध, जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. फक्त रविवारी त्याचा करिष्मा दिसला नाही, हे कोणत्याही खेळाडूसोबत होऊ शकतं. मी शमी आणि टीम इंडियासोबत उभा आहे. वीरेंद्र सेहवागने मोहम्मद शमीवर झालेला ऑनलाइन हल्ला धक्कादायक असल्याचे ट्विट केले आहे. आम्ही शमीसोबत आहोत. तो एक चॅम्पियन आहे आणि जो कोणी इंडियाची कॅप घालतो त्याच्या हृदयात इतर कोणापेक्षा जास्त भारत असतो. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात जलवा दाखव, असं सहवागनं म्हटलं होतं.
पाकिस्तानविरोधातील सामन्यात शमी महागडा ठरला
टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभव झाला होता. वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. या सामन्यात मोहम्मद शमी महागडा ठरला. त्याने 3.5 षटकात 43 धावा दिल्या. सामन्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि अपमानास्पद वक्तव्य करण्यात आली.