BCCI on Mohammad Shami: शमीला ट्रोल करणाऱ्यांना बीसीसीआयचे चोख प्रत्युत्तर
Mohammad Shami: काही लोकांनी सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल केले. राजकारण आणि खेळाशी संबंधित अनेक दिग्गजांनी शमीच्या बचावासाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
BCCI Comes in Support of Mohammad Shami: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) सोशल मीडियावर काही लोकांनी ट्रोल केले होते. राजकारण आणि खेळाशी संबंधित अनेक दिग्गजांनी शमीच्या बचावासाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या ट्विटद्वारे शमीवर निशाणा साधणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी आता बीसीसीआयनेही (BCCI) टीम इंडियाच्या या खेळाडूच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
Proud 🇮🇳
— BCCI (@BCCI) October 26, 2021
Strong 💪
Upward and onward 👍 pic.twitter.com/5NqknojVZj
बीसीसीआयने शमीच्या फोटोसोबत लिहिले, 'गर्व, मजबूत, वर पहा आणि पुढे जा.' बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये शमी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. विकेट घेतल्यानंतर कोहली शमीचे अभिनंदन करत आहे.
पाकिस्तानविरोधातील सामन्यात शमी महाग
टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभव झाला होता. वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. या सामन्यात मोहम्मद शमी महागडा ठरला. त्याने 3.5 षटकात 43 धावा दिल्या. सामन्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि अपमानास्पद वक्तव्य करण्यात आली.
ट्रोल झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू शमीच्या समर्थनार्थ समोर आलेत. दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ट्विट केले की, 'जेव्हा आम्ही टीम इंडियाला सपोर्ट करतो, तेव्हा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सपोर्ट करतो. मोहम्मद शमी एक वचनबद्ध, जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. फक्त रविवारी तो रंग दिसला नाही, हे कोणत्याही खेळाडूसोबत होऊ शकतं. मी शमी आणि टीम इंडियासोबत उभा आहे.
त्याचवेळी टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोहम्मद शमीवर झालेला ऑनलाइन हल्ला धक्कादायक असल्याचे ट्विट केले आहे. आम्ही शमीसोबत आहोत. तो एक चॅम्पियन आहे आणि जो कोणी इंडियाची कॅप घालतो त्याच्या हृदयात इतर कोणापेक्षा जास्त भारत असतो. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात जलवा दाखव.