एक्स्प्लोर
VIDEO : विराटच्या चुकीमुळे बाद, शिखर धवन कर्णधारावर चिडला
गरज नसतानाही धाव घेण्यासाठी पळालेल्या कोहलीवर तो चिडला आणि संताप व्यक्त केला.

Photo : Sony TEN Live TV
डर्बन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने विजयाने सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीचंही मोठं योगदान होतं. या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने शानदार सुरुवात करुन दिली. मात्र तो जेव्हा कर्णधार विराट कोहलीच्या चुकीमुळे बाद झाला, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. गरज नसतानाही धाव घेण्यासाठी पळालेल्या कोहलीवर तो चिडला आणि संताप व्यक्त केला. शिखर धवनने 29 चेंडूत 35 धावा केल्या. शानदार फॉर्ममध्ये फलंदाजी करत असताना छोट्याशा चुकीमुळे त्याला बाद व्हावं लागलं. त्यामुळे एरवी मैदानात शांत आणि नेहमी हसतमुखाने दिसणारा धवन संतापलेला दिसला. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावरही त्याचा संताप दिसत होता. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्याशी बोलताना तो संतापलेला दिसून आला. दरम्यान, विराट कोहलीने धवन बाद झाल्यावर जबाबदारी पार पाडत शतकी खेळी केली. अजिंक्य रहाणेच्या साथीने त्याने मोठी भागीदारी रचत विजयी खेळी केली. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा























