एक्स्प्लोर
...म्हणून धोनीने पंचांकडून चेंडू घेतला : रवी शास्त्री
‘धोनी निवृत्त होत असल्याच्या चर्चा केवळ मूर्खपणाच्या आहेत,’ असं म्हणत रवी शास्त्रींनी धोनीच्या टीकाकारांना फटकारलं आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने पंचाकडून चेंडू घेतला होता. त्यामुळे हे धोनीच्या निवृत्तीचे संकेत आहेत, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण आता भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
‘भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना वातावरणाच्या स्थितीचा अंदाज यावा, म्हणून त्यांना दाखवण्यासाठी धोनीने सामना संपल्यानंतर पंचाकडून चेंडू घेतला,’ अशी माहिती देत शास्त्रींनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
‘धोनी निवृत्त होत असल्याच्या चर्चा केवळ मूर्खपणाच्या आहेत,’ असं म्हणत रवी शास्त्रींनी धोनीच्या टीकाकारांना फटकारलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संथ फलंदाजीमुळे महेद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर टार्गेट करण्यात येत होतं. धोनीने सर्व फॉरमॅटमधून आता निवृत्त व्हावं, असंही मत काहींनी व्यक्त केलं.
अशातच धोनीने सामना संपल्यानंतर पंचाकडून चेंडू घेतल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिकच वेग आला.
दरम्यान, धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
संबंधिता बातम्या : इंग्लंड दौऱ्यानंतर धोनीचे निवृत्तीचे संकेतHere's the video of the MS Dhoni taking the ball from umpires after the game. #ENGvIND pic.twitter.com/C14FwhCwfq
— Sai Kishore (@KSKishore537) July 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement