एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेलाही मुकणार
पदार्पणाच्या कसोटीतच दुखापत झालेल्या शार्दूल ठाकूरला आता पुनरागमनासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेला त्याला मुकावं लागेल.
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीतच दुखापतग्रस्त झालेल्या शार्दूल ठाकूरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेलाही मुकावं लागण्याची शक्यता आहे. शार्दूल ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत पूर्णपणे फिट होण्याची शक्यता नाही, ज्यामुळे त्याला किमान सात आठवड्यांसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी जावं लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून होणार आहे. तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 6 डिसेंबरपासून होईल. मालिकेच्या शेवटी म्हणजे 12 जानेवारीपासून वन डे मालिकेची सुरुवात होईल. मात्र टी-20 आणि कसोटी मालिकेपर्यंत शार्दूल फिट होण्याची शक्यता कमीच आहे.
“मी पूर्ण प्रयत्न करुनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपर्यंत (14 डिसेंबर) फिट होऊ शकत नाही. टी-20 आणि कसोटी संघात जागा मिळवणं कठीण दिसत आहे. माझा प्रयत्न वन डे संघात पुनरागमन करण्याचा असेल. कशा पद्धतीने पुनरागमन करता येईल, त्याकडे सध्या लक्ष देत आहे. मी पुढच्या सात आठवड्यांसाठी ट्रेनिंगमध्ये असेल,” असं शार्दूलने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतून शार्दूल ठाकूरने पदार्पण केलं. पण दहा चेंडू गोलंदाजी करताच त्याला दुखापत झाली, ज्यानंतर तो फलंदाजीसाठी तर आला, पण परत मैदानावर दिसला नाही. यामुळेच त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही खेळता आलं नाही. शार्दूलच्या जागी वन डेमध्ये उमेश यादवला संधी देण्यात आली.
शार्दूल ठाकूरला यापूर्वी आशिया चषकावेळीही दुखापत झाली होती. यामुळे केवळ एक सामना खेळून त्याला मायदेशी परतावं लागलं होतं. दरम्यान, यानंतर त्याने फिट होऊन विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेतला आणि भारतीय संघात पुनरागमन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement