एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का
प्लिस्कोव्हानं कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता प्लिस्कोव्हाला उपांत्य सामन्यात अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाशी झुंजावे लागणार आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या पर्वात टेनिसमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना लागणारे पराभवाचे धक्के काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. जगज्जेत्या रॉजर फेडररला 20 वर्षीय ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासने पराभूत केल्यानंतर आता सेरेना विल्यम्सचं पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून मार्गारेट कोर्टच्या ग्रँड स्लॅम विक्रमाची बरोबरी करण्याचं सेरेना विल्यम्सचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. सेरेनाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हानं सेरेनाचं कडवं आव्हान 6-4, 4-6, 7-5 असं मोडून काढलं.
सेरेना विल्यम्सने आजवरच्या कारकीर्दीत 23 ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावली आहेत. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून, मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदांची बरोबरी साधण्याचा तिचा प्रयत्न होता. पण कॅरोलिना प्लिस्कोव्हाकडून झालेल्या पराभवाने सेरेनाची विक्रमी बरोबरीची संधी हुकली आहे.
दरम्यान, प्लिस्कोव्हानं कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता प्लिस्कोव्हाला उपांत्य सामन्यात अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाशी झुंजावे लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
