एक्स्प्लोर
पहिल्या कसोटीपूर्वी विराट कोहलीसमोर या अडचणी?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Jul 2016 01:09 PM (IST)
1/6

टीम कॉम्बिनेशन: विराट कोहली कसोटी कर्णधार झाल्यापासून प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळाला आहे. कोहली 7-4 पेक्षा 6-5 या फॉर्म्युलावर भर देतो. पण मागील मालिकेत भारतानं 4 गोलंदाज खेळवले होते. त्यामुळे आता कोहली कोणत्या कॉम्बिनेशनला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
2/6

गोलंदाज कोण कोण?: कोहलीच्या संघात अमित मिश्रा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि मोहम्मद शमी हे गोलंदाज आङे. पण वेस्टइंडिजच्या खेळपट्ट्यांचा विचार केला तर ईशांत आणि शमीला संधी मिळू शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून अश्विन आणि मिश्रा खेळू शकतात. पण संघामध्ये जडेजा कि बिन्नी यापैकी कोणाला जागा द्यायची हा मोठा प्रश्न असणार आहे.
3/6

क्रमांक ३ वर कोण?: सलमीवीर फलंदाजानंतर क्रमांक ३ वर कोण खेळणार ही कोहलीची समस्या आहे. कोहलीला या क्रमांकासाठी रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. द्रविडनं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर पुजारा या क्रमांकावर खेळत आला आहे. पण मागील काही सामन्यांमध्ये पुजाराला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात येत आहे तर रहाणे क्रमांक ३वर फलंदाजी करतो आहे.
4/6

सलामीवीर: कोहलीला सलामीवीर म्हणून शिखर धवन किंवा केएल राहुल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. मुरली विजय दुसरा सलामीवीर म्हणून टीम इंडियाची पहिली पसंत आहे.
5/6

दोन सराव सामन्यानंतरही टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन ठरवू शकत नाही. कर्णधार कोहलीनं 13 खेळाडूंची निवड केली आहे. ज्यामध्ये मुरली विजय, केएल राहुल, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, ईशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि मोहम्मद शामी आहे.
6/6

टीम इंडिया वेस्टइंडिजविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. दोन सराव सामन्यानंतर आता 21 जुलैला पहिली कसोटी खेळण्यासाठी टीम इंडिया उतरणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्यानं वेस्टइंडिजला नक्कीच फायदा मिळेल. त्यामुळे कसोटी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला पहिली कसोटी जिंकावी लागणार आहे.
Published at : 20 Jul 2016 01:09 PM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
क्रीडा
पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
क्रीडा
KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO
क्रीडा
गिलच्या विकेटवरुन राडा, अंपायरने पहिले OUT दिले, मग निर्णय फिरवला; न्यूझीलंडचे खेळाडू भिडले, पंत सगळं ऐकत राहिला, काय घडलं?, VIDEO





















