सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी, गूगलने अनुष्का शर्माला राशिद खानची पत्नी दर्शविल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. याचे मजेशीर मीम्स देखील शेअर करण्यात आले होते. आता अशाच दुसर्‍या एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. गूगल भारताचा क्रिकेटर आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा एक भाग असलेल्या शुभमन गिलची पत्नी म्हणून दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर दाखवत आहे.


साराच्या पेण्डंटवर साऱ्यांच्याच नजरा!


दरम्यान, शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत. दोघांमध्ये काहीतरी चालू असल्याचेही दावे केले जात आहेत. कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान शुभमन गिल फील्डिंगचा एक फोटो साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर पोस्ट केला होता. हार्ट इमोजी वापरली होती. मात्र, काही वेळानंतर तिने ती काढून टाकली.


सारा तेंडुलकरकडून शुभमन गिलचं अभिनंदन, हार्दिक पंड्या म्हणतो...


यापूर्वी, शुभमन गिलने स्वत: चा एक फोटो कारसह शेअर केला होता, ज्याला साराने लाईक करत कमेंटमध्ये हार्ट इमोजीने त्याचं अभिनंदन केलं होतं. त्या पोस्टवर टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने शुभमन गिलची मजा घेतली होती. शुभमन गिल सध्या युएईमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससमवेत असून आयपीएल 2020 मध्ये फलंदाजीद्वारे चांगली कामगिरी करत आहे.


यापूर्वी दोघे चर्चेत
सारा तेंडुलकर आणि शुभमल गिल यांचे नाव एकत्र घेण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही सोशल मीडियावर या दोघांच्या डेटिंगच्या अनेकदा बातम्या आल्या आहेत. सारा तेंडुलकरच्या एका पोस्टमुळेही अनेकांनी बरेच अर्थ काढले होते. जेव्हा आयपीएल 2020 च्या सामन्यादरम्यान शुभमन गिलने चांगले क्षेत्ररक्षण केले तेव्हा साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शुबमनचा फोटो पोस्ट करून हार्ट इमोजी दिली होती.