19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात शुभमनने 372 धावा ठोकल्या होत्या. यात सेमी फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात झळकवलेल्या शतकाचाही समावेश आहे. मालिकावीराचा किताब जिंकल्यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडरमध्ये गिलने स्थान मिळवलं. 14 सामन्यांमध्ये 296 धावा त्याने ठोकल्या. आपल्या कमाल कामगिरीनंतर 'ये तौफा हमने खुद को दिया है' स्टाईलमध्ये स्वतःला शानदार रेंज रोवर कार गिफ्ट केली.
VIDEO | रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड 'माझा'वर | खेळ माझा
इन्स्टाग्रामवर आपल्या शानदार गाडीचा फोटो शुभमनने शेअर केला. त्यावर 'थाले मेरे रंगे अंख बाज नालो तेज' असं पंजाबी कॅप्शनही दिली. त्यावर चाहत्यांनी धडाधड शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये एक वेगळी कमेंट होती, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरची. साराने शुभमनला 'काँग्रॅच्युलेशन्स' केलं.
साराच्या मेसेजला शुभमनने 'थँक यू' असा रिप्लाय केला. इतकंच नाही, तर त्यापुढे 'पिंक हार्ट'ची इमोजीही टाकली. त्यामुळे अनेकांच्या भुवया विस्फारल्याच. मात्र क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने न राहवून त्यावर रिप्लायही केला. 'साराच्या वतीने वेलकम बॅक' असं म्हणत पंड्याने शुभमनचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावर चाहत्यांनी पंड्याच्या उत्स्फूर्तपणाला मनमोकळी दाद दिली आहे.