नागपूरचा संकल्प झाला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर; विश्वनाथ आनंद यांनी केले कौतुक
नागपुरातील संकल्प गुप्ता आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर झाला आहे. संकल्प ने वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धिबळाच्या पटावर कौशल्य दाखवण्यास सुरूवात केली होती.
Chess : नागपुरातील संकल्प गुप्ता आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर झाला आहे. संकल्प ने वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धिबळाच्या पटावर कौशल्य दाखवण्यास सुरूवात केली होती. चौथ्या वर्षी सुरू झालेला संकल्पचा बुद्धिबळाचा प्रवास अठराव्या वर्षी ग्रँडमास्टर पर्यंत पोहोचला आहे. सर्बियामधील अरांदजेलोवाक या शहरात आयोजित करण्यात आलेल्या GM (ग्रँडमास्टर) आस्क थ्री राउंड रोबिन या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत संकल्पने ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आहे.
संकल्प उपराजधानी नागपुरातील दुसरा तर देशाचा 71 वा ग्रँडमास्टर आहे. नागपूरच्या व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या संकल्पला संयुक्त कुटुंबात काही मोठ्या भावांकडून बुद्धिबळाचे बाळकडू मिळाले. बुद्धिबळाची गोडी लागलेल्या संकल्पने त्यानंतर बुद्धिबळात आपले कौशल्य दाखवत आपल्या भावांना ही मागे टाकले आणि आज तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर झालाय. विशेष म्हणजे भारताचे पहिले ग्रँडमास्टर असलेल्या विश्वनाथन आनंद यांनी देखील संकल्पचे कौतुक करत ट्वीट केले आहे. लवकरच भारत ग्रॅंडमास्टर्सचा शतक पूर्ण करेल अशी अपेक्षा विश्वनाथन आनंद या ट्वीटमधून व्यक्त केली आहे. विश्वनाथन आनंद यांनी ट्वीटमध्ये लिहीले , 'भारतीय बुद्धिबळा क्षेत्रासाठी हा एक चांगला आठवडा होता. आपल्या नव्या ग्रॅंडमास्टरला शुभेच्छा. आता भारत लकरच ग्रॅंडमास्टर्सचं शतक पूर्ण होईल अशी आशा आहे.' संकल्प गुप्ता स्पर्धेचे एकूण पाच राऊंड जिंकले.
Been a great weekend for Indian chess again ! Congrats to our new entrant … Now how long till we get to our 100 th GM?? https://t.co/qj4j0kLpH2
— Viswanathan Anand (@vishy64theking) November 8, 2021
ENG vs NZ, Match Highlights: न्यूझीलंड फायनलमध्ये दाखल, इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव
वर्ल्ड चेस फेडरेशनने आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर हा सर्वेच्च किताब मानला जातो. हा किताब विश्वनाथन आनंद यांनी 1987 पटकवला होता.
हे देखील वाचा-
- Indian Team Squad: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा, रोहित शर्माकडं कर्णधारपद
- Mumbai Police: विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणारा गजाआड, हैदराबादमधून अटक
- दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ, जय हिंद..! कर्णधार म्हणून विराट कोहलीची शेवटची पोस्ट