Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce: सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; सात वर्षांपूर्वी झाला होता दोघांचा विवाह
Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce: दरम्यान, 2018 साली सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे लग्न झाले होते. त्यानंतर 7 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी घटस्फोट घेतला आहे. सायना नेहवालने काल (13 जुलै) रात्री सोशल मीडियावर पारुपल्ली कश्यपसोबत घटस्फोट (Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce) घेतल्याची पोस्ट करत चाहत्यांना धक्का दिला. घटस्फोट घेण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, 2018 साली सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे लग्न झाले होते. त्यानंतर 7 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सायना नेहवालने नेमकं काय म्हटलं?
आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघंही स्वत:साठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत. या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते, असं सायना नेहवालने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे लग्न कधी झाले?
सायना आणि पारुपल्ली यांचे लग्न 14 डिसेंबर 2018 रोजी झाले. हरियाणातील हिसार येथे जन्मलेली सायना पारुपल्ली कश्यपपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी पारुपल्ली 31 वर्षांच्या होता आणि सायना नेहवाल 28 वर्षांची होती. वयाच्या 30 व्या वर्षी सायनानेही राजकारणात प्रवेश केला, सायना 2020 मध्ये भाजप पक्षात सामील झाली.
सायना नेहवालची कारकीर्द-
बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अनेक मोठे विक्रम आपल्या नावार केले आहेत. सायनाचे आई-वडिलदेखील बॅडमिंटन खेळाडू होते. सायनाने हैदराबादच्या एलबी स्टेडियमधून बॅडमिंटनची ट्रेनिंग घेतली. सायनाने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त एसएम आरिफ यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे घेतले. सायनानेच भारताला बॅडमिंटनचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. सायना नेहवालला 2009-10 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभुषण या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. सायनाने 2009 मध्ये इंडोनेशिया ओपनचे जेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय होती. याशिवाय सायनाने 2010 मध्ये सिंगापूर ओपन, इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, हाँग काँग सुपर सीरीज यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे.
View this post on Instagram
























