एक्स्प्लोर
देवाला मराठी येते?, चाहत्याचा प्रश्नाला सचिनचं उत्तर
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या मनाचा मोठेपणा गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. ट्विटरवर सचिनला मराठीतून तिरकसपणे विचारलेल्या प्रश्नाना त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिलं. प्रश्न विचारणाऱ्यासाठी ही चपराकच होती, असं म्हणावं लागेल.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AskSRT हा हॅशटॅग वापरुन चाहत्यांनी सचिनशी संवाद साधला.
मात्र सुरेश जोशी नावाच्या चाहत्याने गुढीपाडव्याची चर्चा आंग्ल भाषेतून असेल की मराठीतून?, मला माहित आहे प्रश्नाचं उत्तर येणार नाही! देवाला मराठी येते? असा सवालही त्याने विचारला.
त्यावर सचिनने दिलेलं उत्तर,
"सुरेश, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मी गुढीपाडवा घरी साजरा केला. नातेवाईक माझ्या घरी जमले आहेत. दुपारी एकत्र जेवलो आणि आणि रात्रीचं जेवणही एकत्र करणार आहोत."
https://twitter.com/sachin_rt/status/718400780605083648
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement