एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियन बॅट कंपनीविरोधात 14 कोटींचा दावा
ऑस्ट्रेलियातील 'स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल' कंपनीने 2016 साली सचिन तेंडुलकरसोबत करार केला होता, मात्र नाव वापरुनही त्याचा मोबदला न दिल्याबद्दल सचिनने कंपनीला कोर्टात खेचलं आहे
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन बॅट उत्पादक कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. बॅटच्या प्रमोशनसाठी आपलं नाव आणि फोटो वापरुनही 20 लाख डॉलर (अंदाजे 14 कोटी रुपये) चं मानधन न दिल्याबद्दल सचिनने कोर्टात धाव घेतली आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनीस्थित 'स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल' कंपनीने 2016 साली सचिन तेंडुलकरसोबत करार केला होता. क्रीडा उत्पादनं आणि कपड्यांच्या प्रमोशनसाठी सचिनचा फोटो, लोगो वापरण्याचा उल्लेख या करारात होता. यासाठी वार्षिक 10 लाख डॉलर रुपये देण्याचं कंपनीने कबूल केलं होतं.
सचिनने त्यानुसार संबंधित उत्पादनांचं प्रमोशन करत लंडन, मुंबईतील काही इव्हेंट्सना हजेरीही लावली होती. मात्र सप्टेंबर 2018 पर्यंत स्पार्टनने एकही पैसा न दिल्यामुळे सचिनकडून औपचारिक विनंती करण्यात आली. मात्र प्रतिसाद न आल्यामुळे सचिनने करार मोडित काढला आणि यापुढे कंपनीला आपलं नाव न वापरण्यास सांगितलं. मात्र तरीही स्पार्टनने सचिनचं नाव वापरणं सुरुच ठेवलं.
सचिनने स्पार्टनविरोधात 20 लाख डॉलर म्हणजेच अंदाजे 13 कोटी 96 लाख 18 हजार रुपयांचा खटला दाखल केला आहे. मात्र अद्यापही कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement