एक्स्प्लोर

तेव्हा पवार म्हणाले होते, सचिनमुळेच धोनी कर्णधार!

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 44 वाढदिवस आहे. देशभरातूनच नव्हे जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 16 नोव्हेंबर 2013 रोजी निवृत्ती घेतली. त्यादरम्यान तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ब्लॉग लिहून सचिनचं तोंडभरून कौतुक केलं होतं. क्रिकेटविश्वासतला अढळ तारा म्हणून सचिनची स्तुती केली होती. इतकंच नाही, तर सचिनमुळेच धोनी कर्णधार झाल्याचंही पवारांनी म्हटलं होतं. विक्रमादित्य क्रिकेटपटू म्हणून सचिन नावाजला गेलाच आहे. पण क्रिकेटला लालित्य आणि नजाकत देणारा जिगरबाज खेळाडू म्हणून सचिनचा ठसा कुणीच पुसू शकणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं. याशिवाय धोनीला कर्णधार करण्यामागे सचिनच असल्याचं पवारांनी त्यावेळी स्पष्ट केलं. पवार म्हणाले होते, "त्याचं असं झालं, भारतीय संघ द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळत होता. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो आणि लंडनलाच होतो. एक दिवस द्रविड माझ्याकडे आला आणि मला त्याने सांगितलं की, मला कर्णधारपदावरून मुक्त करा. कारण कप्तानपदाच्या ताणाचा माझ्या खेळावर परिणाम होतो. मी द्रविडला सांगितलं,कर्णधारपद तुला असं कसं सोडता येईल? लवकरच साऊथ आफ्रिकेमध्ये टी-20 वर्ल्डकप आहे. त्यानंतर वर्षभरात भारतात वर्ल्डकप आहे. अशावेळी तू कर्णधारपद सोडण्याचा विचार करणं योग्य नाही. तुला कप्तानपदावरून मुक्त केल्यावर ही जबाबदारी कोणावर टाकायची? द्रविडने पुन्हा मुक्त करण्याचा आग्रह केला आणि कप्तानपदी सचिनचं नाव सुचवलं. द्रविडच्या आग्रहाची कल्पना सचिनला देऊन द्रविडने त्याचं नाव कर्णधारपदासाठी सुचविल्याचं मी त्याला सांगितलं. सचिनने लगेचच मला कर्णधारपदासाठी नकार देऊन धोनीची कर्णधारपदी निवड करण्यास सुचवलं".

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget