एक्स्प्लोर
सचिनची सांगलीतील पाणी पुरवठा योजनेसाठी 15 लाखांची मदत
राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रीतील पाणी पुरवठा योजनेसाठी खासदार निधीतून 15 लाखांची मदत केली.
सांगली : भारताचे महान क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी सांगलीमधल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या पाणीपुरवठा योजनेसाठी आपल्या खासदार निधीतून 15 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे.
तासगाव तालुक्यातल्या तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख संजय बारकुंड यांनी ही माहिती दिली.
या केंद्रातल्या पाणीपुरवठा योजनेला अर्थसहाय्य करावं म्हणून आपण अनेक दिग्गजांना लेखी निवेदन दिलं होतं. पण सचिन तेंडुलकर यांचा अपवाद वगळता कुणीच आपल्याला दाद दिली नसल्याचं बारकुंड यांनी सांगितलं.
सचिन यांनी मात्र आमचं निवेदन मिळताक्षणी त्यांच्या खासदार निधीतून 15 लाख रुपये मंजूर केल्याचं बारकुंड यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement