Rohit Sharma : 'एक्स्प्रेसवे'वर रोहित शर्माची आलिशान कारने तब्बल दोनशेच्या स्पीडने सुसाट धाव? वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई
वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित शर्मा ताशी 200 किमी वेगाने गाडी चालवत होता. वेग काहीवेळा ताशी 215 किमीपर्यंत पोहोचला. एवढ्या वेगामुळे रोहित शर्माच्या नावाने तीन ऑनलाइन चलन जारी करण्यात आले.
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी अत्यंत सुसाट म्हणजे दोनशेच्या वेगाने कार चालवल्याने (Rohit Sharma issued 3 challans for overspeeding) चलन बजावण्यात आले आहे. रोहित शर्मा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express way) अतिशय वेगाने कार चालवत होता. त्यानंतर चलन जारी करण्यात आले. रिपोर्टनुसार, रोहितला वेगात तीन ट्रॅफिक चालान लागली आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सहभागी होण्यासाठी रोहित शर्मा मुंबईहून पुण्याला येण्यासाठी स्वतः कार चालवत होता.
वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित शर्मा ताशी 200 किमी वेगाने गाडी चालवत होता. या काळात त्याचा वेग काहीवेळा ताशी 215 किमीपर्यंत पोहोचला. एवढ्या वेगामुळे रोहित शर्माच्या नावाने तीन ऑनलाइन चलन जारी करण्यात आले.
Rohit Sharma issued 3 challans for overspeeding at the Mumbai-Pune highway.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2023
He was crossing 200kmph while driving. (Pune Mirror). pic.twitter.com/52ghlg7b3m
पुणे-मुंबई एक्स्प्रेसची वेगमर्यादा किती आहे?
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहन चालवण्याचा कमाल वेग ताशी 100 किलोमीटर आहे. यापेक्षा जास्त वेग असल्यास ठिकठिकाणी कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे यापेक्षा जास्त वेग असल्यास चलन पाठवले जाते. रोहित शर्मा एका आलिशान कारमधून पुण्याला जात होता, असे सांगण्यात येत आहे.मात्र, रोहितसारख्या खेळाडूसाठी हे चांगले उदाहरण नाही. रोहित हा जागतिक क्रिकेटचा मोठा खेळाडू मानला जातो. अशा परिस्थितीत त्याने अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे योग्य मानले जाऊ शकत नाही.
पोलिसांनी रोहितला सवलत दिली नाही
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माविरुद्ध जारी करण्यात आलेल्या वेगवान चालानबाबत पुणे पोलिसांनी कोणतीही सवलत दिली नाही. कारण जास्त वेगामुळे कोणताही अपघात होऊ शकतो. अशा स्थितीत पोलिसांनी रोहित शर्माच्या नावावर तीनदा चलन बजावले.
ऋषभ पंतचा वेगात गाडी चालवल्यामुळे मोठा अपघात
गेल्यावर्षी टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा वेगात गाडी चालवल्यामुळे मोठा अपघात झाला होता. दिल्लीहून रुरकीला जात असताना ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकल्याने उलटली. या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला अनेक दिवस रुग्णालयात राहावे लागले. ऋषभच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यासाठी त्याचे ऑपरेशन करावे लागले. यामुळे ऋषभ इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या स्पर्धांमधून बाहेर पडला.
इतर महत्वाच्या बातम्या