एक्स्प्लोर

IPL 2020: विराटच्या नावे नव्या विक्रमाची नोंद, 'ही' कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू

विराट कोहली आयपीएलमध्ये 200 षटकार मारणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीने ही कामगिरी केली.

RCBvsCSK: आयपीएलच्या 44 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. बंगलोरने 20 षटकांत 145 धावा केल्या. बंगलोरने दिलेलं लक्ष्य चेन्नईने 18.1 षटकात पूर्ण केलं. सामन्यात आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीने 43 चेंडूत 50 धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. यासह त्याने आयपीएलमध्ये एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या आयपीएल कारकीर्दीतला 200वा षटकार ठोकला. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत विराटनं हा विक्रमी षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा विराट हा आजवरचा पाचवा खेळाडू ठरला आहे तर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीने ही कामगिरी केली. कोहलीच्या आधी या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 209 तर धोनीने 216 षटकार लगावले आहेत.

आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 336 षटकार ठोकले आहेत. त्याच्यापाठोपाठ आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सने 231 षटकार ठोकले आहेत.

बंगलोर हिरव्या जर्सीत मैदानात

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ आज हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही बंगलोरनं चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ही परंपरा कायम राखली.

महत्त्वाच्या बातम्या

रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget