एक्स्प्लोर
...म्हणून सामनाधिकाऱ्यांनी जाडेजाला दंड ठोठावला!

इंदूर: भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजावर इंदूर कसोटीत खेळपट्टीचं नुकसान केल्याप्रकरणी आयसीसीनं दंडाची कारवाई केली आहे. भारताच्या पहिल्या डावात एकेरी-दुहेरी धावा घेताना जाडेजा जाणूनबुजून खेळपट्टीच्या मधोमध धावत होता. पंचांनी त्याला वारंवार ताकीद देऊनही त्यानं आपल्या वागणुकीत सुधारणा केली नाही. त्यामुळं अखेर पंचांनी जाडेला पेनल्टी म्हणून न्यूझीलंडला पाच धावांचा बोनस दिला. त्यामुळं एकही चेंडू न खेळता न्यूझीलंडच्या खात्यात पाच धावा जमा झाल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यावर सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी जाडेजाला सामन्यातील मानधनाच्या पन्नास टक्के दंड ठोठावला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























