एक्स्प्लोर

Rajvardhan Hangargekar: राजवर्धन हंगरगेकरनं वय लपवलं! BCCIला दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती

Rajvardhan Hangargekar Age News : अंडर-19 विश्वविजेत्या भारतीय संघाचा शिलेदार राजवर्धन हंगरगेकरनं 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही वय लपवून विश्वचषक खेळल्याचं समोर आलं आहे.

Rajvardhan Hangargekar Age News : भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला असला तरी एका घटनेमुळे त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. अंडर-19 विश्वविजेत्या भारतीय संघाचा शिलेदार राजवर्धन हंगरगेकरनं 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही वय लपवून विश्वचषक खेळल्याचं समोर आलं आहे. क्रीडा-युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला अहवाल सादर केला आहे. बनावट रेकॉर्डच्या आधारे 21 वर्षे असतानाही हंगरगेकरनं अंडर-19 भारतीय संघात स्थान मिळवल्याचं बकोरिया यांनी अहवालात म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी सर्व पुरावेही जोडले आहेत.

बकोरिया यांनी या संदर्भात उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. राजवर्धननं वय लपवल्याचे या अहवालात म्हटलं आहे. राजवर्धन हा उस्मानाबाद जिल्ह्यातील 'तेरणा पब्लिक स्कूल' चा विद्यार्थी आहे. शाळेतील रेकॉर्डनुसार त्याची पहिली ते सातवीपर्यंत जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. पण आठवीमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश घेताना त्याची जन्मतारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 करण्यात आली, असा आरोप आहे.  अशी दुरुस्ती करताना जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. मात्र तशी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

त्यामुळे बनावट रेकॉर्डच्या आधारे राजवर्धन हंगरकेकर यांनी भारतीय संघात स्थान मिळवण्याच दिसलं. त्यामुळे वयाचे एकवीस पूर्ण झाली असताना देखील त्यांना आपली जन्मतारीख लपवून संघात प्रतिनिधित्व मिळवल्याचं ओम प्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.  

या अहवालासोबत सर्व पुरावे देखील जोडलेले आहेत. यात जन्म प्रमाणपत्र, पहिली वर्गात प्रवेश घेतल्यानंतर नोंदवलेली जन्मतारीख, टीसीवरची  जन्म तारीख इत्यादी कागदपत्र आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय या खेळाडू वर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाच आहे. एका खेळाडूच्या चुकीमुळे भारताची प्रतिमा पणाला लागली आहे.
 
अहवालासोबत कागदपत्रं दिल्याचा दावा करत ओम प्रकाश बकोरिया यांनी म्हटलं आहे की, राजवर्धन हंगरगेकर यांचे वर्तन क्रीडा एकात्मता आणि नैतिकतेच्या विरुद्ध आहे. हे न्याय्य खेळापासून वंचित राहते आणि परिणामी राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते. त्यामुळे कायद्यानुसार कठोर कारवाई करावी ही विनंती, असं अहवालात म्हटलं आहे. 

कोणत्या कागदपत्रावरून झाली जन्मतारखेची पडताळणी

मानेगाव येथील जन्मदाखला
 
2. इयत्ता 1 ली प्रवेश फॉर्म
 
3. इयत्ता 1 ली जनरल रजिस्टर, नोंद
 
4. इयत्ता 2 री उत्तीर्ण शाळा सोडल्याचा दाखला
 
5. इयत्ता 5 वी उत्तीर्ण शाळा सोडल्याचा दाखला
 
6. इयत्ता 6 वी प्रवेश नोंद जनरल रजिस्टर
 
7. इयत्ता 7 वी उत्तीर्ण शाळा सोडल्याचा दाखला
 
8. इयत्ता 8 वी प्रवेश नोंद जनरल रजिस्टर
 
9. इयत्ता 10 उत्तीर्ण शाळा सोडल्याचा दाखला
 
10. प्रवेश निर्गम दि. 05.01.2022
 
11. जन्म प्रमाणपत्र नगर परिषद उस्मानाबाद 
 
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shriniwas Patil : श्रीनिवास पाटलांची निवडणूकीतून माघार; तब्येत ठीक नसल्यानं रिंगणातून बाहेरABP Majha Headlines : 4 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDinesh Bub : ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, राजकुमार पटेल यांच्याकडून उमेदवारीBJP Nashik Loksabha Constituency : नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
RCB Vs KKR Dream11 Prediction:  कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Deepti Naval Life Story : दोन वर्षातच काडीमोड, प्रियकराचा कर्करोगानं मृत्यू; डिप्रेशनही वाट्याला आलं, अभिनेत्रीची हृदय पिळवटणारी कहाणी
दोन वर्षातच काडीमोड, प्रियकराचा कर्करोगानं मृत्यू; डिप्रेशनही वाट्याला आलं, अभिनेत्रीची हृदय पिळवटणारी कहाणी
Sanjay Mandlik : मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा
Amol Kolhe On Govinda Ahuja :  गोविंदा चालतो, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवले जाते? अमोल कोल्हेंचा सवाल
Amol Kolhe On Govinda Ahuja : गोविंदा चालतो, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवले जाते? अमोल कोल्हेंचा सवाल
Embed widget