Nadal into French Open final : तीन तासांच्या सामन्यानंतर एलेक्जेंडर दुखापतग्रस्त, राफेल नदालचा फायनलमध्ये प्रवेश
Rafael Nadal French Open 2022 : क्ले कोर्टचा बादशाह अशी ओळख असलेल्या राफेल नदालनं (Rafael Nadal) फायनलमध्ये धडक मारली आहे.
Rafael Nadal French Open 2022 : क्ले कोर्टचा बादशाह अशी ओळख असलेल्या राफेल नदालनं (Rafael Nadal) फायनलमध्ये धडक मारली आहे. फ्रेंज ओपन स्पर्धेतील एलेक्जेंडर ज्वेरेव याला दुखापत झाल्यामुळे उपांत्य फेरीचा सामना अर्ध्यातून सोडावा लागला. दुसऱ्या हाफमध्ये एलेक्जेंडर ज्वेरेव मैदानातच कोसळला. त्याला उठताही आले नाही. त्याला स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी कुबड्याची मदत घ्यावी लागली. एलेक्जेंडर ज्वेरेव दुखापतग्रस्त झाल्यामुळे राफेल नदालला विजयी घोषीत करण्यात आले. फ्रेंच ओपन स्पर्धेत राफेल नदालने फायनलमध्ये धडक मारली आहे.
#BREAKING Rafael Nadal into French Open final after Alexander Zverev leaves semi-final in 2nd set with shock injury pic.twitter.com/0aaauLT9sk
— AFP News Agency (@AFP) June 3, 2022
एलेक्जेंडर ज्वेरेव दुखापतग्रस्त झाल्यानंतर राफेल नदालने दु:ख व्यक्त केले. तसेच त्याला मैदानाबाहेर जाण्यास मदत करत खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. एलेक्जेंडर ज्वेरेव याच्या दुखापतीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Alex Zverev got a bad injury in a #RolandGarros match-up against Rafael Nadal, after which he couldn't even continue playing. 😵
— 1хBet (@1xBet_Eng) June 3, 2022
Wishing @AlexZverev a speedy recovery. You played like a champion 🏆pic.twitter.com/2oy9glRU8q
💔#RolandGarros pic.twitter.com/zgb9XPqDBU
— Roland-Garros (@rolandgarros) June 3, 2022
Get well soon, Alexander 🧡#RolandGarros pic.twitter.com/Is3k7dHiUo
— Roland-Garros (@rolandgarros) June 3, 2022
👏#RolandGarros pic.twitter.com/92f8AhegIQ
— Roland-Garros (@rolandgarros) June 3, 2022
एलेक्जेंडर ज्वेरेव आणि राफेल नदाल यांच्यामध्ये जवळपास तीन तासांपासून सामना सुरु होता. राफेल नदालने पहिल्यापासूनच सामन्यावर पकड मिळवली होती. एलेक्जेंडर ज्वेरेव 7-6 (10/8), 6-6 ने पिछाडीवर होता. दुसऱ्या सेटमधील टाय ब्रेकरमध्ये नदालने फॉरहँड शॉट खेळला.. त्याला प्रत्युत्तर देताना एलेक्जेंडर ज्वेरेवचा पाय मुरडला अन् कोर्टावरच तो कोसळला.. त्यावेळी एलेक्जेंडर ज्वेरेव वेदनाने त्रस्त होता होता. ते पाहून उपस्थित प्रेक्षकही स्थब्ध झाले होते. तात्काळ फिजिओ मैदानात पोहचलं तोपर्यंत तो खेळणार नाही, हे स्पष्ट झाले होते. एलेक्जेंडरने स्पर्धेतूनच माघार घेतली. तो काही काळ चेंजिंग रुममध्ये परतला.. तेथून तो कोर्टवर कुबड्याच्या मदतीने आला.. उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून त्याची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला... त्याच वेळी राफेल नदाल याने त्याला मिठी मारत सांत्वन केलं. राफेलच्या खिलाडू वृत्तीचं चारीबाजूने कौतुक होतेय.
दरम्यान, नदालने 13 फ्रेंच ओपन तसेच 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन ओपन आणि 4 यूएस ओपन जेतेपदं जिंकली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. तर 2020 मध्ये फ्रेंच ओपनचं अखेरचं विजेतेपद जिंकलं होतं. 1968 मध्ये सुरू झालेल्या टेनिसच्या ओपन एरामध्ये ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद 13 वेळा पटकावणारा नदाल जगातील पहिला खेळाडू आहे. फ्रेंच ओपन लाल मातीवर खेळली जाते. याच कारणामुळे नदालला 'लाल माती'चा राजा असंही म्हटलं जातं.