एक्स्प्लोर

पीव्ही सिंधू ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्य फेरीत धडक

रिओ दी जेनेरिओ: भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं चीनच्या वर्ल्ड नंबर टू आणि लंडन ऑलिम्पिकची रौप्यपदकविजेती वँग यिहानचा 22-20, 21-19 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. सिंधूनं हा सामना 54 मिनिटांत जिंकला.   या सामन्यात वँग यिहाननं सिंधूला कडवी टक्कर दिली. पण सिंधूनं वेळोवेळी वँग यिहानचं आव्हान मोडून काढलं. त्यामुळं आता सिंधू ऑलिम्पिकपदकापासून केवळ एक विजय दूर आहे. सिंधूसमोर आता उपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकूहाराचं आव्हान असून हा सामना 18 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी खेळवला जाईल.   दरम्यान, पी. व्ही. सिंधू ही ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारी दुसरीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरलीय. याआधी सायना नेहवालनं 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठून कांस्यपदकाची कमाई केली होती.   India's Sindhu Pusarla, right, greet by China's Wang Yihan after winning the Women's Singles Quarterfinal at the 2016 Summer Olympics in Rio de Janeiro, Brazil, Tuesday, Aug. 16, 2016. (AP Photo/Vincent Thian) (AP Photo/Vincent Thian)   उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात सिंधूनं आपलं सर्वस्व पणाला लावलं. सिंधूच्या आक्रमक आणि बचावात्मक खेळापुढं वँग यिहान अगदीच निरुत्तर ठरली. बॅडमिंटनमध्ये चिनी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळतो. पण सिंधूनं वँग यिहानला घरचा रस्ता दाखवून चीनची भिंत भेदण्याचा पराक्रम गाजवला.   सिंधूसमोर वँग यिहानचे ड्रॉप्स आणि स्मॅशेस परतवून लावण्याचं मोठं आव्हान होतं आणि सिंधूनही ते आव्हान अगदी लिलया पेललं. या सामन्यात पहिल्या गेममध्ये वँग यिहाननं 11-8 अशी तीन गुणांची आघाडी घेतली होती. पण सिंधूनं जबरदस्त कमबॅक करुन पहिला गेम 22-20 असा जिंकला. तर दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे 18-13 अशी आघाडी होती. पण त्यानंतर सिंधूनं वँगला सलग सहा गुणांची खिरापत वाटली. त्यामुळं वँग दुसरा गेम जिंकेल असं वाटत होतं. मात्र सिंधूनं सलग तीन गुणांची वसूली करुन वँग यिहानचं आव्हान 21-19 असं मोडून काढलं.   सिंधूसमोर आता उपांत्य फेरीत जपानच्या सहाव्या मानांकित नोझोमी ओकुहाराचं आव्हान असेल. जर सिंधूनं नोझोमी ओकुहाराला हरवलं तर यंदाच्या ऑलिम्पिकमधलं भारताचं पहिलं पदक निश्चित होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

Embed widget