बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही पैलवान साक्षी मलिक आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला अभिवादन केले आहे.
2/6
तर टीम इंडियाचा माजी धडकेबाज क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपल्या हटके स्टाईलमध्ये पीव्ही सिंधूचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.
3/6
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सिंधूच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच तिला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
4/6
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर सर्वच स्तरातून तिचं अभिनंदन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंधूच्या कामगिरीचे कौतुक करुन तिचे अभिनंदन केलं आणि अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
5/6
महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरुन सिंधूचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पीव्ही सिंधू तू रिकाम्या हाताने नव्हे, तर पदक जिंकूनच मायदेशी परतणार आहेस. आम्ही तुझ्यासोबत 'सेल्फी' काढण्यास उत्सुक आहोत, असं म्हटले आहे.